Movie Fauzi two parts will released  Instagram
मनोरंजन

Movie Fauzi | आता प्रभासच्या ‘फौजी’ चित्रपटाचे दोन भाग पाहता येणार, दुसऱ्या भागात उघडणार रहस्य

Movie Fauzi | आता प्रभासच्या ‘फौजी’ चित्रपटाचे दोन भाग पाहता येणार, दुसऱ्या भागात उघडणार रहस्य

स्वालिया न. शिकलगार

मैत्री मूवी मेकर्सचा ‘फौजी’ हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार असून दुसरा भाग प्रीक्वल असेल. पहिल्या भागात मुख्य कथा तर दुसऱ्या भागात नायकाचा भूतकाळ दाखवला जाईल. चित्रपटाबद्दलचे इतर तपशील लवकरच जाहीर होणार असून हा प्रोजेक्ट मोठ्या स्केलवर बनत असल्याची चर्चा आहे.

Movie Fauzi two parts will released

मुंबई - दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मोठमोठे प्रोजेक्ट्स घेऊन येण्यासाठी ओळखली जाणारी मैत्री मूवी मेकर्स हे बॅनर पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी दमदार अ‍ॅक्शनपट घेऊन येत आहे. या नवीन चित्रपटाचे नाव आहे ‘फौजी’. विशेष म्हणजे, हा चित्रपट दोन स्वतंत्र भागांत प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी नुकतीच ही घोषणा केली आहे.

मैत्री मूवी मेकर्सने जाहीर केलेल्या माहितीनुसार, ‘फौजी’चा पहिला भाग मुख्य कथा सांगणार आहे. परंतु, दुसरा भाग मात्र प्रीक्वल असणार आहे. प्रभास हा या चित्रपटासाठी सीता रामम चे दिग्दर्शक हनू राघवपुडी यांच्यासोबत काम करत आहे. प्रेक्षकांना प्रभासला आजाद हिंद फोर्समधील एका सैनिकाच्या रुपात पाहता येणार आहे.

‘फौजी’मध्ये कोण कोण कलाकार झळकणार याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र, सूत्रांनुसार या चित्रपटासाठी टॉप दक्षिणात्य स्टारचे नाव चर्चेत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करणार, शूटिंग कधी सुरू होणार, लोकेशन्स कोणती असणार याबाबतही निर्माते लवकरच जाहिर करतील.

या चित्रपटात आम्ही प्रभासची एक वेगळी दुनिया दाखवत आहोत, आणि दुसरा इंस्टॉलमेंट एक वेगळ्या परिमाणाचा शोध घेईल. आपल्या वसाहतवादी भूतकाळात इतकं समृद्ध साहित्य दडलेलं आहे, अशा कथा ज्या दुःखदरीत्या संपल्या, पण इतर एखाद्या वास्तवात त्या परीकथेसारख्या असू शकल्या असत्या. यात मी काही वास्तविक जीवनातील अनुभवही जोडले आहेत, ज्यांनी मला वैयक्तिकरित्या प्रेरित केले.
- हनू राघवपुडी,दिग्दर्शक

यानंतर देखील प्रभास आता RRR चित्रपटाचे कोरिओग्राफर सोबत काम करणार आहे. ऑस्कर विजेते आर आर आर चित्रपटातील गाणे नाटू नाटूचे कोरिओग्राफर प्रेम रक्षित सोबतचा नवा चित्रपट बिग असेल आणि दिग्दर्शन रक्षितच करतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT