Main Hoon Na sequel buzz x account
मनोरंजन

Main Hoon Na 2 विषयी मोठे अपडेट! कोण-कोण कलाकार? शाहरुखच्या स्टोरी येणार नवं ट्विस्ट?

Main Hoon Na 2 - 'मैं हूं ना २' मध्ये शाहरुख खान दुहेरी भूमिकेत? कलाकारही तेच?

स्वालिया न. शिकलगार

Main Hoon Na 2 संदर्भात बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. शाहरुख खान पुन्हा एकदा मेजर रामच्या भूमिकेत दिसणार का, याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. दिग्दर्शिका फराह खान आणि SRK यांची जोडी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता असून, कथेत मोठा ट्विस्ट आणि नव्या कलाकारांची एंट्री होणार असल्याची चर्चा आहे.

Main Hoon Na 2 to feature Shah Rukh Khan in double role?

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि एंटरटेनिंग चित्रपटांपैकी एक असलेल्या मै हू नाचा सिक्वेल येणार असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरू झाल्या आहेत. २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने शाहरुख खानच्या करिअरमध्ये वेगळीच ओळख निर्माण केली होती. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाहरुख खान पुन्हा एकदा मेजर राम प्रसाद शर्माच्या भूमिकेत दिसणार का? याबद्दल चर्चा होऊ लागल्या आहेत.

बहुप्रतीक्षित 'किंग' नंतर आता शाहरुख खान जवळपास १२ वर्षांनंतर मै हू ना च्या सीक्वलमध्ये दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. शाहरुख फराह खानसोबत पुन्हा एकत्र काम करण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून फराह 'मैं हूं ना २' च्या पटकथेवर काम करत असल्याची चर्चा होती. आता, मीडिया रिपोर्टनुसार, 'मैं हूं ना २' हा किंग खानचा पुढचा मोठा चित्रपट म्हणून चर्चेत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख आणि फराह यांच्यात जोरदार चर्चा सुरू आहे, ज्यामुळे दीर्घ कालावधीनंतर ते एकत्र काम करणार आहेत.

शाहरुख खान आणि फराह खान यांनी शेवटचे २०१४ मध्ये 'हॅपी न्यू इयर'मध्ये एकत्र काम केले होते. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट यशस्वी ठरला. त्याआधी, २००७ मध्ये 'ओम शांती ओम' आणि २००४ मध्ये प्रदर्शित झालेला 'मैं हूं ना' असे काही उल्लेखनीय चित्रपट आहेत. आता इतक्या वर्षांनंतर 'मैं हूं ना २'च्या स्टोरी मूळ गाभा ठेवून एक मोठा सिक्वेल भेटीला येणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, "फराह खानने शाहरुख खानला दुहेरी भूमिकेत लॉन्च केले आहे. शाहरुख दोन वेगवेगळे पात्र साकारेल." देशभक्ती आणि मूळ कलाकारांची टीम पुन्हा परत येईल.

मूळच्या चित्रपटात झायेद खान, अमृता राव, सुष्मिता सेनसारखे कलाकार होते. आता हेच कलाकार पुन्हा परत दिसतील का, याची उत्सुकता सिनेरसिकांना लागून राहिलीय. शाहरुख सध्या सिद्धार्थ आनंदच्या "किंग" चित्रपटाच्या तयारीत बिझी आहे. २०२६ मध्ये तो चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT