मोठ्या पडद्यावर धुवांधार यश मिळवल्यानंतर महावतार नरसिंहा सिनेमा ओटीटीसाठी सज्ज झाला आहे. या सिनेमाची भव्यता आणि थरार आता घरबसल्या अनुभवता येणार आहे. भारतातील सर्वात जास्त कमाई करणारा अॅनिमेटेड सिनेमा आता घरच्या स्क्रीनवर पहा. हा सिनेमा ओटीटीवर कधी येणार याची चाहते आतुरतेने वाट पहात आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी याच्या ओटीटी रिलीजची नुकतीच घोषणा केली आहे. (Latest Entertainment News)
विष्णुपुराण, नरसिंह पुराण आणि भागवतपुराणावर आधारलेला हा सिनेमा विष्णुच्या नरसिंह अवतारावर बेतला आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. नेटफ्लिक्सने नुकतीच याची घोषणा केली आहे.
'भक्ति जी शक्तीचे रूप घेईल, येत आहेत महावतार नरसिंहा' हे कॅप्शन देत नेटफ्लिक्सने रिलीजची तारीख जाहीर केली आहे. 19 सप्टेंबरला म्हणजे आज दुपारी 12.30 पासून हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.
हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा त्याबाबत फारसे बोलले गेले नाही. पण रिलीजनंतर काही दिवसातच त्याने प्रेक्षकांचे कौतुक मिळवले. यामुळे सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत गेला. हा सिनेमा भारतातील सर्वात जास्त कमाई करणारा अॅनिमेटेड सिनेमा ठरला. भारतात या सिनेमाने जवळपास 249 कोटींचा गल्ला जमवला. आश्विन कुमार यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.
निर्माते अश्विनी कुमार यांनी या सिरिजमधील 5 सिनेमांची घोषणा केली आहे. यामध्ये 'महावतार परशुराम, महावतार रघुनंदन, महावतार द्वारकाधीश, महावतार गोकुळानंद, महावतार कल्की हे सिनेमे आहेत.
यामध्ये महावतार परशुराम 2027 मध्ये, महावतार रघुनंदन 2029 मध्ये, महावतार द्वारकाधीश 2031 मध्ये, महावतार गोकुळानंद 2033 मध्ये तर महावतार कल्की 2035 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.