Maharashtra Global film facility deals 3000 crore investment
नवी दिल्ली : सिनेमा क्षेत्रासाठी चांगले वृत्त समोर आले आहे. ग्लोबल फिल्म फॅसिलिटी देण्यासंदर्भात महत्त्वाचा करार झाला असून महाराष्ट्र सरकार, DNEG आणि प्राईम फोकस यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या माध्यमातून जवळपास ३ हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात केली जाणार आहे.
प्राईम फोकस लिमिटेड (PFL) ही जगातील सर्वात मोठी स्वतंत्र एकीकृत मीडिया पॉवरहाऊस, ४ महाद्वीप आणि ७ टाईम झोनमधील १६ शहरांमध्ये ८ हजारहून अधिक व्यावसायिकांना रोजगार देते. ही कंपनी मीडिया आणि मनोरंजन उद्योगाला अँड-टू-अँड क्रिएटिव्ह सेवा आणि इतर सेवा देते.
२०१४ मध्ये, प्राईम फोकसचे अकादमी पुरस्कार विजेत्या कंपनी DNEG मध्ये विलीनीकरण झाले, जी जगातील सर्वात मोठ्या व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX) सेवांपैकी एक आहे.