Maharashtra Epstein Files released date out  pudhari photo
मनोरंजन

Maharashtra Epstein Files |'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' मधून 'कॅप्टन भोंदू बाबा'चा खरा चेहरा येणार समोर!

'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' मधून 'कॅप्टन भोंदू बाबा'चा खरा चेहरा येणार समोर!

स्वालिया न. शिकलगार

‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या नावाने चर्चेत आलेल्या दस्तऐवजांमुळे ‘कॅप्टन भोंदू बाबा’ यांच्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सोशल मीडियावर या विषयाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून विविध दावे, प्रतिक्रिया आणि पडताळणीच्या मागण्या समोर येत आहेत. अद्याप समोर आलेल्या माहितीकडे अधिकृत पुष्टीची प्रतीक्षा असली तरी या प्रकरणामुळे राज्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे.

Maharashtra Epstein Files released date announced

महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात खळबळ माजवण्यासाठी एक नवा वास्तववादी चित्रपट सज्ज झाला आहे. 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले असून, यातील 'कॅप्टन भोंदू बाबा' कोण? याची चर्चा आता संपूर्ण राज्यात रंगू लागली आहे. मोशन पोस्टर प्रदर्शित करून 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

जैन फिल्म प्रोडक्शन आणि मातोश्री एन्टरटेन्मेंट वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी देवेंद्र भट, सुर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे यांनी स्वीकारली आहे. वास्तवदर्शी कथानकावर आधारलेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक स्वरूप बी. सावंत यांनी एक आव्हानात्पक पाऊल टाकले आहे.

काय आहे पोस्टरमध्ये?

प्रदर्शित पोस्टरमध्ये एक व्यक्ती पाठमोरी उभी असून तिच्या हातात पाचशेच्या नोटांची बंडल्स दिसत आहेत. त्या व्यक्तीने पांढरा कुर्ता-पायजमा आणि जॅकेट परिधान केले आहे, जे एका 'सभ्य' गृहस्थाचे प्रतीक वाटते. मात्र, त्याच्या भोवती असलेल्या 'क्राईम सीन'च्या पिवळ्या फिती आणि भिंतीवरील 'नाशिक' व 'भोंदूबाबा' असे लिहिलेले फोटो एका मोठ्या गुन्ह्याकडे अंगुलिनिर्देश करतात.

दिग्दर्शन

या चित्रपटाची कथा सागरकुमार एस. जैन यांनी लिहीली असून, पटकथा व संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. डिओपी आकाश काकडे या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करणार असून, कला दिग्दर्शन अक्षय आंबेकर करणार आहेत. वेशभूषा आकांक्षा गांधी यांची असून, सचिन घणवंत या चित्रपटाचे प्रोडक्शन हेड आहेत तसेच नेहा घोडके प्रॉडकशन कंट्रोलर म्हणून काम पाहणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT