महाकुंभ मेळ्यातील व्हायरल गर्ल म्हणून प्रसिद्ध झालेली Monalisa सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आली आहे. ‘लव्ह जिहाद’च्या आरोपांमुळे तिला ट्रोल करण्यात आले होते. यावर प्रतिक्रिया देताना मोनालिसाने स्पष्ट केले की हे सर्व चुकीचे आहे आणि ती प्रत्येक धर्माचा आदर करते.
Mahakumbh girl Monalisa on love jihad controversy
महाकुंभ मेळ्यातील एका व्हिडिओमुळे अचानक प्रसिद्ध झालेली मोनालिसा सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिच्याबद्दल काही पोस्ट आणि तिचे लग्नाचे फोटो, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला. विशेषतः ‘लव्ह जिहाद’च्या आरोपांमुळे हे प्रकरण चर्चेचा विषय ठरले.
या ट्रोलिंगनंतर मोनालिसाने स्वतः पुढे येत या आरोपांवर स्पष्ट प्रतिक्रिया दिली. तिने प्रसारमाध्यमांना सांगितले की ‘लव्ह जिहाद’सारख्या गोष्टींशी तिचा काहीही संबंध नाही. सोशल मीडियावर पसरत असलेल्या अनेक गोष्टी चुकीच्या आणि अफवा असल्याचेही तिने स्पष्ट केले.
मोनालिसाच्या म्हणण्यानुसार ती प्रत्येक धर्माचा आदर करते आणि कोणत्याही धर्माविषयी तिच्या मनात वाईट भावना नाहीत. ती म्हणाली- ''मी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले. ते लव्ह जिहाद नाही. मी सर्व धर्मांचा आदर करते आणि प्रत्येक धर्माला समान मानते.''
तिने लव्ह जिहादचा दावा फेटाळला. अनेक जण तिला फसवल्याचे म्हणत होते. पण तिने सांगितले की, आम्ही हिंदू रितीरिवाजाप्रमाणे लग्न केले आहे. मोनालिसाने केरळमधील अभिनेता फरमान खानसोबत आंतरधर्मीय विवाहाचे समर्थन केले. यावेळी तिच्यासोबत तिचा पती फरमान देखील होता. मोनालिसा म्हमाली की, फरमान खानशी लग्न करण्याचा निर्णय पूर्णपणे तिचा स्वतःचा होता आणि सुरुवातीला त्याने काही संकोच केला असला तरी तिने लग्नासाठी त्याच्याकडे आग्रह धरला होता.
मोनालिसाला प्रयागराज महाकुंभमेळा २०२५ मध्ये देशभर प्रसिद्धी मिळाली होती. एका फोटोग्राफरने तिचे डोळे आणि सौंदर्य कॅमेराबद्ध केले आणि ते व्हायरल केले. बघता बघता तिचे फोटो, व्हिडिओ सर्वदूर पसरले.
मोनालिसा भोसलेने गुरुवारी (१२ मार्च २०२६) अभिनेता फरमान खानसोबत केरळमधील तिरुअनंतपुरम येथील एका मंदिरात जाऊन लग्न केले. दोघांनीही धर्मांतर केलेले नाही असा दावा केला.
तिने सांगितले "माझ्या पालकांना मी माझ्या आंटीच्या मुलाशी लग्न करावे अशी इच्छा होती, पण मला तो आवडत नव्हता. मी मिस्टर खानशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.''