Love and War clash Toxic latest update
मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा चित्रपट लव्ह अँड वॉर बद्दल नवं अपडेट समोर आलं आहे. सुपरस्टार यशचा चित्रपट टॉक्सिक आणि रणबीर आलियाचा चित्रपट लव्ह अँड वॉर आमने सामने येणार का याबद्दल माहिती समोर आलीय.
यशच्या टॉक्सिक चित्रपटामुळे लव्ह अँड वॉरची रिलीज डेट पोस्टपोन करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. आता हा चित्रपट यशच्या टॉक्सिकशी क्लॅश होणार नाही.
२०२६ चा सर्वात मोठी चित्रपट म्हणून रणबीर कपूर-आलिया भट्टचा चित्रपट लव्ह अँड वॉरकडे पाहिले जात आहे. हा चित्रपट ईदच्य़ा निमित्ताने रिलीज होणार होती. त्याचवेळी टॉक्सिक देखील रिलीज होणार होता. आता मीडिया रिपोर्टनुसार, आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा रिलीज पोस्टपोन करण्यात आला आहे. चित्रपटाचे शूटिंग देखील ठरलेल्या शेड्यूल पेक्षा मागे पडले आहे.
लव्ह अँड वॉर रिलीजमध्ये होणार उशीर
रिपोर्टनुसार, लव्ह अँड वॉर आपल्या शेड्यूल पेक्षा खूप मागे पडली आहे. पुढील वर्षी जूनपर्यंत चित्रपट रिलीज होऊ शकतो. सूत्रांच्या हवाल्याने दावा करण्यात आला आहे की, ‘हा एक आशीर्वादाप्रमाणे आहे. कारण दोन पॅन इंडिया चित्रपटांसोबत रिलीज होण्यात काही अर्थ नाही. आता ७५ दिवसांचे शूट बाकी आहे, आणि संजय लीला भन्साळी यांनी रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशलला म्हटले आहे की, २०२६ च्या उन्हाळयापर्यंत एकदम तारखा मिळाव्यात, जेणेकरून चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले जाऊ शकेल.’
रणबीर कपूर आणि संजय लीला भन्साळी लवकरच चित्रपटाच्या रिलीज डेट विषयी निर्णय घेऊन तारीख घोषीत करतील.
हे असतील कलाकार मुख्य भूमिकेत
लव्ह अँड वॉरमध्ये आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि विकी कौशल दिसणार आहेत. हे पहिल्यांदा होई जेव्हा तिन्ही स्टार्स एकत्र काम करतील. संजय लीला भन्साळींच्या या प्रोजेक्टची खूप प्रतीक्षा लागून राहिलीय.