Lokah Chapter 1 box office collection
मुंबई - लोका चॅप्टर १ ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पाच दिवसात चित्रपटाने तब्बल ८१ कोटींची कमाई केलीय. आता लवकरच हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल. कल्याणी प्रियदर्शनचे या चित्रपटात कमाल केलीय. हा चित्रपट २८ ऑगस्टला चित्रपटगृहात रिलीज झाला होता.
चार दिवसात चित्रपटाने २४.३ कोटी नेट कमाई केली होती आणि ४१ कोटी ग्लोबली कमावले होते. चित्रपटाला रविवारचा खूप फायदा मिळाला. ९.७५ कोटींचे दमदार कलेक्शन करत पुन्हा यश मजबूत केले. मल्याळम चित्रपट लोका चॅप्टर १ - चंद्राची खूप चर्चा होतेय. लोका चॅप्टर १ ला परदेशात चांगला प्रतिसाद मिळाला. सहजतेने चित्रपटाने ८० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
सोमवारपर्यंत, लोका चॅप्टर १ ने भारतात ३६.२० कोटी रु. कमावले. यामध्ये सोमवारी ६.६५ कोटींची चांगली कमाई केली. रविवारी १०.१० कोटींचे कलेक्शन केले.
अंदाजानुसार, मध्य पूर्व आणि उत्तर अमेरिकेत चांगली कमाई झाली आहे. सध्या परदेशी बाजारपेठेत कमाईचा आकडा ४५ कोटी रुपये आहे. यामुळे चित्रपटाची जगभरातील कमाई फक्त पाच दिवसांत ८१ कोटी रुपये झाली आहे. यामुळे 'लोका चॅप्टर १'ने आतापर्यंतच्या २० सर्वाधिक कमाई करणाऱ्या मल्याळम चित्रपटांमध्ये स्थान मिळवले आहे.