Kamini Kaushal death  Instagram
मनोरंजन

Kamini Kaushal | ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल काळाच्या पडद्याआड, 'कबीर सिंह'मध्ये केली होती प्रसिद्ध भूमिका

सदाबहार कामिनी कौशल काळाच्या पडद्याआड, 'कबीर सिंह'मध्ये केली होती प्रसिद्ध भूमिका

स्वालिया न. शिकलगार

ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे निधन झाले असून ‘कबीर सिंह’मधील आजीची भूमिका त्यांची नव्या पिढीतही खास ओळख बनली होती. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

veteran actress kamini kaushal passes away

मुंबई - दिग्गज अभिनेत्री यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. नीचा नगर, जिद्दी आणि लाल सिंग चड्ढा या चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री कामिनी कौशल यांनी आपल्या दीर्घ करिअरमध्ये अनेक अविस्मरणीय भूमिका साकारल्या होत्या. भारतीय चित्रपटातील आपल्या अदा, कौशल्य आणि उत्तम अभिनयाने मोठ्या पडद्यावर आपली प्रतिमा निर्माण केली. त्यांच्या जाण्याने मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

परिवाराने केली निधनाची पुष्टी

कामिनी यांच्या परिवाराने त्यांच्या निधनाची पुष्टी केली आहे. सोबतच आवाहन केलं आहे की, त्यांच्य़ा गोपनीयतेचा आदर केला पाहिजे.

अखेरीस या चित्रपटात दिसल्या होत्या कामिनी

कामिनी यांनी आपल्या करिअरची सुरुवात 'नीचा नगर' चित्रपटातून केली होती. तयांना १९४६ च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रतिष्ठित Palme d'Or पुरस्कार मिळा होता. यानंतर त्यांनी 'शहीद', 'नदिया के पार', 'शबनम', 'आरजू', 'बिरज बहू' यासारखे अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांचा अखेरचा चित्रपट २०२२ मध्ये रिलीज झालेला लाल सिंह चड्ढा होता. 'कबीर सिंह'मध्ये शाहिद कपूरच्या आजीची भूमिका देखील त्यांनी साकारली होती. नव्वदीच्या दशकात त्यांनी ९० हून अधिक चित्रपटात काम केलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT