Dashavatar Box Office Collection day 15
मुंबई - अमेरिकेतील २५ पेक्षा जास्त शहरात जवळपास १०० स्क्रीन्सवर ‘दशावतार’ने आपली रुंजी घातलीय. सुबोध खानोलकर लिखित दिग्दर्शित 'दशावतार’ला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाची गोष्ट निसर्ग रक्षणाशी संबंधित आहे. मानवी जीवन आणि पर्यावरणातील नातं, आधुनिकतेच्या नावाखाली होणारी निसर्गाची हानी आणि त्यावर उपाय यांचा प्रभावी वेध या चित्रपटात घेतला आहे. त्यामुळे केवळ मनोरंजनापुरताच नाही, तर सामाजिक जाणीवा निर्माण करणारा चित्रपट म्हणूनही ‘दशावतार’कडे पाहिलं जातंय.
यात दिलीप प्रभावळकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, आरती वडगबाळकर, महेश मांजरेकर, रवी काळे, लोकेश मित्तल, अभिनय बेर्डे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
पहिल्याच आठवड्यात हाऊसफुल्ल शोजने धमाकेदार सुरुवात केलेल्या या चित्रपटाचा उत्साह अद्यापही कमी झालेला नाही. उलट दिवसेंदिवस वाढतच आहे. बॉक्स ऑफिसवर भरभरून कमाई करत असलेला हा चित्रपट केवळ कथेमुळेच नाही, तर प्रभावी मांडणी, दमदार कलाकारांचा अभिनय आणि आपल्या संस्कृतीशी जोडणाऱ्या कहाणीमुळे चर्चेत आहे.
दशावतारने १५ व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर भारतात १८.४५ कोटींची कमाई केली. पाहा चार्ट-
झी स्टुडिओजची प्रस्तुती असलेल्या चित्रपटाला कोकणात चांगले यश मिळाले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी, पेण, कणकवली, महाड, चिपळूण या सर्व भागातील प्रत्येक थिएटरमध्ये हा चित्रपट पाहता येतोय.
झी स्टुडिओजची प्रस्तुती, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांचे असून त्यांच्यासह सुजय हांडे, ओंकार काटे, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे आणि विनायक जोशी चित्रपटाचे निर्माते आहेत. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहेत.