Celebs Raksha Bandhan 
मनोरंजन

Lata Mangeshkar-Dilip Kumar Special Bond Raksha Bandhan | दिलीपकुमार यांना 'युसूफभाई' म्हणायच्या लतादीदी; संगीत अन् अभिनयाच्या दोन दिग्गजांमधील ‘हे’ नातं तुम्हाला माहित्येय का?

Lata Mangeshkar-Dilip Kumar Special Bond- चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गजांचे खास होते रक्षाबंधन

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : लता मंगेशकर आणि दिलीप कुमार. संगीत आणि अभिनयाच्या क्षेत्रातील ही दोन उत्तुंग नावं. या दोन दिग्गजांमध्ये अगदी सख्ख्या बहीण-भावासारखे प्रेम होते. दिलीपकुमार यांना लतादीदी 'युसूफभाई' म्हणत असत व दरवर्षी त्यांना राखी बांधत. दिलीपकुमार यांचे लतादीदींवर धाकट्या बहिणीप्रमाणेच प्रेम होते.

असे म्हटले जाते की, ऑगस्ट १९७० च्या रक्षाबंधनदिनी लतादीदींनी दिलीपकुमार यांच्या घरी जाऊन त्यांना पहिल्यांदा राखी बांधली होती. त्यानंतर त्यांचा हा राखीचा सण दरवर्षी न चुकता सुरू झाला.

दिलीपकुमार यांच्या निधनापूर्वीचा (७ जुलै २०२१) ऑगस्ट २०२० चा रक्षाबंधन हा त्यांच्या हयातीतील शेवटचा सण ठरला. वयोमानामुळे व दोघांच्याही प्रकृती अस्वास्थ्यामुळे नंतरच्या काळात प्रत्यक्ष भेट कमी झाली असली, तरी लतादीदी दिलीपकुमार यांना नियमितपणे राखी पाठवत असत आणि त्यांची विचारपूस करत असत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT