Lakhat Ek Amcha Dada Instagram
मनोरंजन

Lakhat Ek Amcha Dada | तुळजाने, घेतला सत्यजितशी लग्न मोडण्याचा निर्णय

तुळजाने का घेतला सत्यजितशी लग्न मोडण्याचा निर्णय?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'लाखात एक आमचा दादा' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. कलाकारांचे दमदार अभिनय आणि कथानक हे या मालिकेचं वेगळेपण ठरलं आहे. सध्या मालिकेत एक नाही तर दोन लग्नांची लगबग सुरु आहे. दादाच्या घरी मोठी बहीण तेजू हिचा साखरपुडा ठरला आहे. साखरपुड्यासाठी घरात जोरदार तयारी सुरु आहे, सगळे उत्साहात आहेत. दादाचा आनंद गगनात मावत नाहीये.

सूर्याच्या बहिणीच्या लग्नाची तयारी पाहून जालंदरला स्वतःच्या मनाशी गाठ बांधतो की, तेजश्रीच्या लग्नाआधी आपल्या घरात तुळजाचं लग्न धूमधडाक्यात व्हायला हवं. तुळजाचा भाऊ शत्रुघ्न लोकांना गुंतवून ठेवतो आणि तेजूच्या लग्नात विघ्न आण्यासाठी गोंधळ घालतो. ज्यामुळे सूर्या दादाची आई पळून गेली आहे, ह्यावर चर्चा रंगते आणि तेजूचं लग्न मोडतं.

सूर्यादादाच्या घरात जेव्हा हे कळत तेव्हा संपूर्ण घर उद्ध्वस्त होतं. जालिंदरच्या कानावर ही बातमी पोहोचते. दादाने सर्वांना या दु:खातून बाहेर काढायचा निर्णय घेतलाय. तर दुसरीकडे गावात जत्रा आयोजित केली गेली आहे. त्या जत्रेत तुळजा सूर्याला सांगते की, तिला सत्यजितशी लग्न करायचं नाहीये आणि म्हणूनच ती ज्या जत्रेला जात आहे तिथे तिला सूर्याची सोबत हवी आहे. हे ऐकून सूर्याने तुळजाला जत्रेला घेऊन जायचे ठरवलं आहे.

तुळजा तिच्या मनातलं सूर्यासमोर सांगू शकेल? यामुळे सूर्याच्या स्वप्नाला नवीन पंख मिळतील? सत्यजितशी लग्न न करायचा निर्णयामुळे काय असेल जालिंदरचा पुढचा डाव ? या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी "लाखात एक आमचा दादा" रोज रात्री ८:३० वा. झी मराठीवर पाहता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT