India-Pakistan Tensions will change in the film Lahore 1947
मुंबई : भारत - पाकिस्तान तणावादरम्यान, सनी देओलचा चित्रपट लाहौर 1947 चर्चेत आहे. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर कोणताही सीन असंवेदनशील होऊ नये, ज्यामुळे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी निर्माते बैठक घेऊन तोडगा काढणार आहेत. ७ मे ला ऑपरेशन सिंदूरनंतर अनेक चित्रपट निर्मात्यांमध्ये या मोहिमेवर चित्रपट काढण्यासाठी स्पर्धा लागली होती. तर दुसरीकडे, येऊ घातलेला चित्रपट लाहौर 1947 चे निर्माते कोणत्याही वादापासून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत. केवळ सनी देओलच नाही तर त्यामध्ये काजोलचा 'सरजमी' चित्रपटदेखील समाविष्ट आहे.
सनी देओलने 'बॉर्डर', मां तुझे सलाम, इंडियन, गदर सारखे हिट चित्रपट दिले आहेत. अनेक देशभक्तीपर चित्रपटाती त्याचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. आता सनी देओल लवकरच आमिर खान प्रोडक्शन अंतर्गत चित्रपट 'लाहौर 1947' मध्ये दिसणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरचा परिणाम भारत- पाकिस्तान आधारित येत असलेल्या काही चित्रपटांवरही दिसत आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित करताना कुठलीही बाधा येऊ नये म्हणून निर्माते चित्रपटावर बैठक घेणार आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, सनी देओल-प्रिटी जिंटा स्टारर चित्रपट लाहौर 1947 च्या टीम मध्ये बैठक सुरू झालीय. हा चित्रपट भारत-पाकिस्तान फाळणीच्या पृष्ठभूमीवर आधारित आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी कर आहेत. त्यांनी याआधी दामिनी, घायल, घातक यासारखे चित्रपट आणले आहेत.
काजोल, पृथ्वीराज सुकुमारन, इब्राहिम अली खान स्टारर सरजमी चित्रपटातही बदल करणार असल्याची माहिती समोर आलीय. निर्मात्यांमध्ये बैठक होत आहेत. हा चित्रपट ३० मे रोजी प्रदर्शित होणार हता. आता चित्रपटातील काही सीन्समध्ये बदल केले जात आहेत. पुन्हा डबिंग केले जात आहे.
लाहौर 1947 मध्ये सनी देओल सोबत प्रीती जिंटा, शबाना आजमी, अली फजल मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. हा चित्रपट जून २०२५ मध्ये रिलीज केला जाईल, असे म्हटले जात आहे.