टेलिव्हिजनविश्वात एक काळ असा होता की, ज्यावेळी एकता कपूरच्या मालिका प्राइम टाइमवर राज्य करत होत्या. त्या दोन मालिकांपैकी एक 'क्यों की सास भी कभी बहू थी' आणि 'कहानी घर घर की' या मालिका अनेकांच्या पसंतीस उतरली होती. आता यापैकी क्यों की... चा दूसरा सीझन येऊ घातला आहे. दर आठवड्याला क्यों की च्या टीआरपीची टक्कर अनुपमाशी होत असते. त्यामुळे क्यों की च्या मेकर्सना दरवेळी मालिकेत एक नवीन ट्विस्ट आणला आहे. (Latest Entertainment News)
असे बोलले जात आहे की कहानी घर घर की ची पार्वती म्हणजे साक्षी तंवर आणि ओम म्हणजे किरण करमरकर हे या सीझनमध्ये दिसणार आहेत. मिहिर आणि तुलसी यांना पुन्हा एकत्र भेटवण्यासाठी क्यों की..च्या एपिसोडमध्ये पार्वती आणि ओम येणार आहेत.
याचा प्रोमोही समोर आला आहे. फॅन्सही तुलसी आणि पार्वतीला एकत्र पाहण्यासाठी आतुर आहेत.
क्यों की सास भी कभी बहू थीच्या दुसऱ्या सीझनला चांगलीच लोकप्रियता मिळते आहे. या शोचा टीआरपी चार्ट दुसऱ्या स्थानावर कायम आहे. आता मेकर्स या मालिकेला नंबर वनला आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सध्या टीआरपीवर नंबर वन असलेल्या अनुपमाला टक्कर देण्यासाठी क्यों कीच्या मेकर्सनी कंबर कसली आहे.
नेटीझन्स म्हणाले, ‘ खूपच मनाला स्पर्श करणारे ! तुलसी आणि पार्वती भाभी टेलिव्हीजनच्या दोन सुपरस्टार सूना एकत्र दिसणार.’ दुसरा म्हणतो, ‘स्टार प्लसचे सगळ्यात लाडक्या व्यक्तिरेखा परत आल्या आहेत.’