MTV Roadies Double Cross winner Kushal Tanwar know about Gullu
मुंबई - एल्विश यादवच्या टीममधील धाकड खेळाडू कुशाल तंवरने MTV Roadies XX मध्ये बाजी मारली आहे. कुशाल तंवर उर्फ गुल्लूने फिनालेमध्ये हरताज सिंहला टक्कर देत रोडीज डबल क्रॉसचे किताब आपल्या नावे केले. रोडीजच्या २० व्या सीझनमध्ये त्याला ट्रॉफीसोबत त्याला एक चमचमती Karizma XMR बाईक आणि १० लाख रुपयांचा चेक मिळाला. शोचा होस्ट रणविजयने गुल्लूचे नाव विजेता म्हणून जाहीर केले.
२०२५ मध्ये रिॲलिटी शो रोडीज XX डबल क्रॉस चे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रिंस नेरूला, नेहा धूपिया, रिया चक्रवर्ती, एल्विश यादवच्या टीममधील सदस्यांमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळाली. त्यानंतर एल्विश यादवने देखील सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला. कुशाल तंवर उर्फ गुल्लूचा हा विजय पहिल्यांदाच गँग लीडर बनलेल्या एल्विश यादवसाठी एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नव्हते. रोडीज डबल क्रॉसचे फिनाले आव्हानात्मक होते.
प्रिंस नेरुलाच्या टीमचा खेळाडू हरताज सिंह आणि कुशाल तंवर यांच्यात एक टास्क ठेवण्यात आला होता. कुशालने हरताज आणि ऋषभला काही सेकंदात किरकोळ फरकाने हरवून रोडीज चँपियन'चा किताब आपल्या नावे केला.
एल्विशने कुशालचे अभिनंदन करत लिहिले, 'मी भावनांनी भारावून गेलो आहे! मला हे जाहीर करताना खूप आनंद होत आहे की माझा भाऊ कुशल तंवर (गुल्लू) आणि मी रोडीज डबल क्रॉसचा सीझन जिंकला आहे! हा प्रवास एक अविश्वसनीय प्रवास होता आणि मी माझ्या भावासोबत तो शेअर करण्यास खूप आभारी आहे! आम्ही ते केले, गुल्लू!'
कुशाल तंवर गुरुग्राम, हरियाणा येथील कंटेंट प्रोड्यूसर आहे. त्याला गुल्लू बॉक्सर किंवा गुल्लू म्हणून ओळखले जाते. रिपोर्टनुसार, २०२२ मध्ये, कुशालने पुण्यातील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (IHMCT) मधून हॉटेल मॅनेजमेंटमध्ये बॅचलर ऑफ सायन्स पदवी प्राप्त केली. त्याने त्याच्या गावी एका कॅफेची स्थापना देखील केली, जे नंतर बंद पडले.