Kushal Badrike pudhari
मनोरंजन

Kushal Badrike: Please आजच्या पुरतं कुणी जेवायला देईल का? कुशल बद्रिकेची भन्नाट पोस्ट होते आहे व्हायरल

एरवी कुशल सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात असतो

अमृता चौगुले

आपल्या अतरंगी कॉमिक टायमिंगने सगळ्यांना खळखळून हसवणारा अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. ‘चला हवा येऊ द्या' या शोमधून कुशलने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवले. या शोने त्याला स्वत:चा असा खास चाहतावर्गही निर्माण केला आहे.

एरवी कुशल सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. आताही त्याने अशीच धमाल पोस्ट शेअर केली आहे. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये त्याच्यासोबत पत्नी सुनैनाही दिसते आहे. (Latest Entertainement News)

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, ‘लोकांच्या बायका नवऱ्याच्या डोक्यावर थयथयाट करतात , पण माझी बायको…
“तिगदा तुई-तुई थुई-थयाट ! करते”
एकदा माझ्या मुलाला शाळेत प्रश्न विचारला की,
“मोर” कसा नाचतो? तर तो थुई-थुई न म्हणता,
“तिगदा तुई तुई थुई ऽऽ” म्हणल्याचं मला स्पष्ट आठवतय !
एकदा तर तो, बे पंचे “तिग-दहा” म्हंटल्याचं मी स्वतःच्या कानाने ऐकलय.
लोकांच्या संसाराला नजर लागते, माझ्या संसाराला..
“तिगदा तुई तुई थुई ऽऽ” लागलाय.

# please आजच्या पुरतं कुणी जेवायला देईल का ? ‘

कुशलच्या पोस्टवर फॅन्ससह इतर सहकलाकारही कमेंट करत आहेत. स्ट्रगलर सालामधील कुशलचा जिगरी दोस्त असलेल्या विजू माने यांनीही कमेंट केली आहे. ते म्हणतात, ‘बायको कशीही असली तरी असं जाहिरपणे...असो.’

तर अभिनेता सुमित राघवन म्हणतो, ‘ "उभा आडवा आता तुला धुते ती ... तुला धुते ती..तुला धुते ती ...तुला धुते ती...".

तर विशाखा सुभेदार कमेंट करताना म्हणते, ‘हलकट.. काय चेहेरे करतोयस.. मेलास तु आता..’

कुशल सध्या चला हवा येऊ द्या - कॉमेडीचा गॅंगवार या शोमध्ये दिसतो आहे. कुशल आणि सूनैना ही जोडी नुकतीच 'आम्ही सारे खवय्ये' जोडीचा मामला या शोमध्ये दिसली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT