Kumar Sanu-Rita Bhattacharya Defamation Case instagram
मनोरंजन

Kumar Sanu-Rita Bhattacharya| बॉलीवूडच्या प्रसिद्ध गायकाचा कोर्टात लढा, एक्स पत्नीवर ठोकला मानहानीचा खटला, मागितली ३० लाखांची नुकसान भरपाई

Kumar Sanu-Rita Bhattacharya Defamation Case- कुमार सानूने एक्स पत्नीवर ठोकला मानहानीचा खटला, मागितली ३० लाखांची नुकसान भरपाई

स्वालिया न. शिकलगार

बॉलीवूडचे ज्येष्ठ गायक कुमार सानू यांनी त्यांच्या एक्स पत्नी रीटा भट्टाचार्य यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला असून, ३० लाख रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे.

Kumar Sanu Defamation Case against Rita Bhattacharya

बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध पार्श्वगायक कुमार सानू सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी आपल्या एक्स पत्नी रीटा भट्टाचार्य यांच्याविरोधात कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला असून, त्यात ३० लाख रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. या प्रकरणामुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.

कुमार सानू यांनी एक्स पत्नी रीता भट्टाचार्य यांच्या विरोधात बॉम्बे हायकोर्ट खटला दाखल केला आहे. सोबतच मुलाखत हटवण्याची मागणीही केली आहे. त्या मुलाखतीत रीता यांनी तथाकथित अपमानास्पद विधाने केली आहे. या प्रकरणाची सुनावणी १७ डिसेंबर रोजी होईल.

याचिकेत म्हटल्यानुसार, रीटा भट्टाचार्य यांनी अनेक प्लॅटफॉर्मवर मुलाखती दिल्या आहेत, ज्यामध्ये कुमार सानू यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. कुमार सानू यांनी रीटा यांच्या गरोदरपणात वाईट वागणूक, अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. रीटा यांनी असा दावा केला आहे की, कुमार सानू यांनी त्यांना उपाशी ठेवले, स्वयंपाकघरात बंद केले होते. शिवाय, मेडिकल संबंधित कुठलीही सेवा दिली नाही. तिच्या गरोदरपणात तिच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई देखील सुरू केली होती. शिवाय त्यांनी कुमार सानूंवर त्यांचे दुसरीकडे अनेक अफेअर्स असल्याचे आरोप केले.

आता या मुलाखती हटवण्यासाठीची मागणी कोर्टाकडे कुमार सानू यांनी केली आहे. शिवाय बदनामी झाल्याने ३० लाखांची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केलीय.

याचवर्षी सप्टेंबरमध्ये, या मुलाखती सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे हे प्रकरण अधिक चिघळले. त्यानंतर कुमार सानू यांनी कायदेशीर मार्ग धरला. वकील सना रईस खान यांच्या मार्फत खटला दाखल करण्यात आला असून तिने युक्तीवाद केला आहे की, 'ही विधाने ९ फेब्रुवारी २००१ रोजी वांद्रे कुटुंब न्यायालयात घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान झालेल्या संमती कराराच्या अटींचे उल्लंघन करतात, ज्यामध्ये असे म्हटले होते की कोणताही पक्ष भविष्यात एकमेकांवर आरोप करू शकत नाही.'

कोण आहे वकील सना रईस खान?

गायक कुमार सानू आणि त्यांची पत्नी रीता भट्टाचार्य यांना जान कुमार सानू नावाचा एक मुलगा आहे. तो बिग बॉस-१४ मध्ये दिसला होता. सानू यांची वकील सना रईस खान ही बिग बॉस १७ ची स्पर्धक होती.

बदनामी झाल्याने खटला?

मानहानीच्या याचिकेत युक्तिवाद केला आहे की, रीटा यांच्या विधानांमुळे कुमार सानूच्या प्रतिमेला नुकसान पोहोचले आहे. त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. २७ सप्टेंबर रोजी, रीटा भट्टाचार्य आणि मीडिया पोर्टल्सना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती, ज्यामध्ये म्हटलं होतं की, जर मुलाखती हटवल्या गेल्या नाहीत तर फौजदारी कारवाई सुरू केली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT