Krushna Abhishek-Kiku Sharda dispute
मुंबई - कॉमेडियन कृष्णा अभिषेक आणि कॉमेडियन किकू शारदा यांच्यातील बॅकस्टेज व्हिडिओ व्हायरल होत आहे. कृष्णा आणि किकू यांच्यातील वादाचा हा व्हिडिओ आहे. दोघे जण एका शो च्या शूटिंगला घेऊन वाद करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ द ग्रेट इंडियन कपिल शोच्या सेटचा आहे. नेमकं काय झालं?
या व्हिडिओमध्ये कृष्णा अभिषेक आणि कीकू शारदा यांच्यात भांडण होताना दिसते. या व्हिडिओमध्ये कीकू शारदा म्हणतो-'मी टाईमपास करत आहे? तर कृष्णा अभिषेक रागात म्हणतो- ठिक आहे मग तुम्हीच करा. काही समस्या नाही. तो कीकू शारदाला हात जोडून म्हणतो, भाऊ, मला कुठलाही प्रोब्लेम नाही तुम्ही करा. मी जात आहे.'
सेटवर उपस्थित लोक कृष्णा अभिषेकला समजवतात. मग कीकू शारदा म्हणतो की,ती गोष्ट नाही. जर मला बोलावण्यात आलं आहे तर मी पहिल्यांदा संपवेन ना! तेव्हा कृष्णा अभिषेक म्हणतो, भाई आय लव्ह यू, मी तुमचा सन्मान करतो. मी माझा आवाड वाढवू इच्छित नाही. कीकू म्हणतो, आवाज वाढवण्याची गोष्ट नाही. तुम्ही हे वेगळ्या पद्धतीने घेऊन चाललात.
video- rvcjmovies and rvcjinsta इन्स्टाग्रामवरून साभार
दोघांचे फॅन्स हा व्हिडिओ पाहून हैराण आहेत. ही खरचं लढाई आहे की प्रँक आहे, असा प्रश्न त्यांना पडलाय. पण अद्याप दोन्ही कलाकारांकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.
कपिलच्या शोमध्ये कृष्णा अभिषेक आणि कीकू शारदा सोबत परफॉर्म करतात. दोघांची जोडीही प्रेक्षकांना आवडणारी आहे.