मनोरंजन

Doctor Arora : कोण आहे ‘फिरंगी बाबा’? ज्याने दिलेत न्यूड सीन्स

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : नवी वेबसीरीज डॉक्टर अरोडा स्ट्रीम होताच धुमाकूळ घातलीय. (Doctor Arora) ही सीरीज सेक्स समस्यांविषयी असलेला टॅबूला तोडते. सीरीजमध्ये दिसत असलेले जवळपास सर्व स्टार्सनी उत्तम अभिनय साकारला आहे. पण, एक पात्र असे आहे की, ही सीरीज संपल्यानंतरही प्रेक्षकांच्या मनात आहे ते पात्र म्हणजे फिरंगी बाबा. (Doctor Arora)

सीरीजमध्य़े फिरंगी बाबा म्हणून ओळखल्या जाणारे अभिनेते आहेत. -राज अर्जुन. ते हिंदी चित्रपटचं नाही तर मल्याळम, तमिळ, तेलुगू चित्रपटांमध्येही काम केलं आहे. प्रत्येक भूमिका ते त्यात साचेबद्ध व्हावेत अशा पद्धतीने करतात. डॉक्टर अरोरामधील त्यांच्या अभिनयामुळे ते चर्चेत आले आहेत.

ट्रेलरमध्ये राज अर्जुन यांचे पात्र दाखवण्यात आले नव्हते. आता सीरीज पाहिल्यानंतर त्याची भूमिका गुप्त का ठेवण्यात आली होती हे कळते. फिरंगी बाबाच्या भूमिकेत त्याचा अभिनय, लूक, डायलॉग डिलिव्हरी सगळंच परफेक्ट आहे.

सोने पे सुहागा म्हणजे सीरीजमध्ये हिंदी बोलणे. फिरंगी बाबा बनलेल्या राज अर्जुनने या मालिकेत न्यूड सीन दिले आहेत.

अभिनेत्याला न्यूड का व्हावे लागले, याचे कथानक असे आहे की, फिरंगी बाबा आश्रम चालवतात. जिथे त्यांच्या शेकडो महिला भक्त आहेत. बाबांना वैयक्तिक भेटण्याची प्रत्येकाची मागणी असते. आता या सर्व महिला भक्तांच्या मागण्या पूर्ण करता करताना फिरंगी बाबाला वेदना होत असतात.

या वेदनामुळे त्याला सेक्सोलॉजिस्ट ला भेटण्याची गरज असते. पण एक प्रसिद्ध चेहरा असल्याने तो सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर अरोरा यांना रेल्वे स्टेशनवर गुपचूप भेटतो. हीच मोठी चूक त्याच्याकडून होते.

स्टेशनवर कुठेतरी लपून बसलेल्या फिरंगी बाबा रुग्णाची डॉक्टर तपासणी करतात, तेव्हाच तिथे लोकांचा जमाव येतो. जमावाने फिरंगा बाबीचे कपडे हिसकावले. फिरंगी बाबा नग्नावस्थेत पळून जातो. आपली ओळख लपवण्यासाठी बाबा कपड्याने तोंड गुंडाळतात.

नग्न फिरंगी बाबा स्वतःला वाचवण्यासाठी संपूर्ण रेल्वे स्टेशनवर धावतो. मग रिक्षा चोरतो आणि त्याच्या आश्रमात पोहोचतो. तेथे त्यांचे सहाय्यक नग्न फिरंगी बाबाची सुटका करतात. राज अर्जुनने सीरीजमध्ये उत्तम काम केले आहे. त्याने न्यूड सीन्स दिल्याने प्रेक्षकांमध्ये एकच चर्चा होते.

राज अर्जुनबद्दल बोलायचे झाले तर तो ब्लॅक फ्रायडे, रईस, सीक्रेट सुपरस्टार, शेरशाह, थलाइवी, लव्ह हॉस्टेल यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला आहे. त्याने टीव्हीवर साईबाबांची भूमिकाही साकारली आहे. त्याच्या उत्तम कामासाठी त्याला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

डिअर कॉम्रेडमध्ये झळकलाय राज अर्जुन

डिअर कॉम्रेड या चित्रपटाता साऊथ स्टार रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा सोबत राज अर्जुनने काम केले होते. तो साऊथ इंडस्ट्रीचा एक प्रसिध्द चेहरा आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT