मनोरंजन

Kiran Mane : बिग बॉस फेम किरण माने यांची साताऱ्यात मिरवणूक (Video)

स्वालिया न. शिकलगार

सातारा : पुढारी वृत्तसेवा – बिग बॉस फेम किरण माने यांनी बिग बॉस कार्यक्रमात टॉप फाईव्हमध्ये क्रमांक काढला. (Kiran Mane) त्यांनी या कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांची साताऱ्यातून जंगी मिरवणूक काढण्यात आली. बॉम्बे रेस्टॉरंट ते राजवाडा या मार्गावर ही मिरवणूक निघाली. यावेळी माने यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. (Kiran Mane)

बिग बॉस फेम किरण माने यांचे मंगळवारी सायंकाळी साताऱ्यात आगमन झाले. पोवईनाका येथील राजधानी सातारा या सेल्फीपाईंटवर फटाक्याच्या आतषबाजीत गुलाब फुलांची उधळण करत, तुताऱ्यांच्या निनादात त्यांचे सातारकरांनी स्वागत केले. आकर्षक रंगी बेरंगी फुलांनी सजविलेल्या जीपमधून त्यांच्या मिरवणूकीस सुरूवात झाली. शिवतीर्थ पोवईनाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास किरण माने यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यावेळी ठिकठिकाणी सातारकरांच्यावतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर मिरवणूक पोवईनाका, रविवारपेठ, पोलिस मुख्यालयमार्गे राजवाड्याकडे मार्गस्थ झाली. किरण माने यांचे सातारकर नागरिक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून स्वागत करत होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT