ketaki chitale -Kiran Mane  
मनोरंजन

केतकी चितळेवर किरण मानेंची पोस्ट, ‘अख्खा दर्द तू या व्हिडीओतून पिळवटून ओतलास लै लै म्हंजी लैच ठैंक्यू’

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील ​'वक्फ' मंडळाचं बळकटीकरण करण्यासाठी सरकारने १० कोटींच्या निधीची तरतूद ​केल्याचे सांगत मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने शिंदे सरकारवर संताप व्यक्त केला होता. काल सोशल मीडियाच्यावतीने व्हिडिओ शेअर केला आहे. यावर आता अभिनेते किरण माने यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. किरण माने यांनी तिला समर्थन दिलं आहे.

अधिक वाचा –

फेसबूक पोस्टमध्ये काय म्हणाले किरण माने?

केतकी… तुझ्या दु:खात खुप आनंदानं सहभागी आहोत आम्ही. गेली दहा वर्ष आम्हाला आईबहिणीवरुन ट्रोल करणार्‍या पिलावळीचा 'आतला' अख्खा दर्द तू या व्हिडीओतून पिळवटून ओतलास आणि आमच्या दहा वर्षांच्या संघर्षाचं सोनं केलंस ! लै लै म्हंजी लैच ठैंक्यू…

अधिक वाचा 

काय म्हणाली होती केतकी चितळे?

"एक धक्कादायक बातमी वाचून मी उठले आहे. त्यामुळे काय बोलावं काहीच कळत नाही. ज्या लोकांनी तुम्हाला मतही दिलं नाही. त्यांच्या बळकटीकरणासाठी तुम्ही त्यांना १० कोटी रूपये दिले आहेत. तुम्ही बधीर आहात, की आम्हाला बधीर करून सोडणार आहात? मी नेहमी म्हणत होते, लोकसभेत कोणाला मत द्यायचंय ते ठरलेलं आहे. त्यात काही प्रश्न नव्हता. मला माझा प्रधानमंत्री कोण हवाय हे बघून मत दिलेलं होतं, पण विधानसभेत कोणता झेंडा घेऊ हाती हा प्रश्न पडणार आहे. हे मी आधीपासून म्हणत होते पण तुम्ही तर आता माझं मत तुम्ही खरं करून दाखवणार आहे."

अधिक वाचा 

किरण मानेंची आणखी एक पोस्ट..

"ताईच्या दारात महानगरपालिकेची कर्मचारी भगिनी गेली होती, तेव्हा ताईने तिला जात विचारली होती. ती मराठा म्हणाल्यावर तिला तुच्छतेने हिणवताना ताई म्हणाली, मी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण आहे…मग ताई अचानक हिंदू कशी झाली?"

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT