Pinarayi Vijayan criticizes The Kerala Story national award
मुंबई - केरळच्या मुख्यमंत्र्यांनी 'द केरळ स्टोरी'साठी राष्ट्रीय पुरस्काराची निंदा केली, तो भारतीय चित्रपट परंपरेचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी ज्युरींवर फुटीरतावादी, सांप्रदायिक अजेंडा सांगत आरोप केला. ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा काल संध्याकाळी करण्यात आली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या घोषणेनंतर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी चित्रपटाला मिळालेल्या पुरस्कारानंतर तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिलीय.
पिनाराई यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स अकाऊंटवर लिहिलंय- ''केरळची प्रतिमा खराब करण्याच्या आणि जातीय द्वेषाची बीजे पेरण्याच्या स्पष्ट हेतूने उघडपणे चुकीची माहिती पसरवणाऱ्या चित्रपटाचा सन्मान करून, #NationalFilmAwards च्या ज्युरीने ....फुटीरतावादी विचारसरणीत रुजलेल्या कथेला वैधता दिली आहे. केरळ, जी भूमी नेहमीच जातीय शक्तींविरुद्ध सद्भाव आणि प्रतिकाराचे प्रतीक म्हणून उभी राहिली आहे, त्याचा या निर्णयामुळे गंभीर अपमान झाला आहे. हा निर्णय केरळ सारख्या सौदार्हपूर्ण राज्यासाठी अपमानजनक आहे."
७१ व्या पुरस्कारात अदा शर्मा स्टारर चित्रपट द केरला स्टोरीला दोन पुरस्कार जाहिर झाले. चित्रपटातील कलाकार आणि निर्माते यांनी आनंद व्यक्त केला असताना केरळचे सीएम पिनाराई विजयन यांनी नाराजी व्यक्त केली. सांप्रदायिक अजेंडा असल्याचे म्हणत त्यांनी विरोध दर्शवला आहे.
सुदीप्तो सेन दिग्दर्शित द केरला स्टोरी ५ मे २०२३ रोजी रिलीज झाला होता. यानंतर काही वाद निर्माण झाला होता. भारतात काही राज्यात चित्रपटाला खूप पसंत करण्यात आलं होतं. तर प. बंगाल सारख्या राज्याने चित्रपटावर बंदी घातली होती. आता द केरला स्टोरीचे दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफीला राष्ट्रीय पुरास्काराने सन्मानित केलं जाणार आहे. पण मुख्यमंत्र्यांनी संताप व्यक्त करत ज्युरीवर गंभीर आरोप केले आहेत.
विजयन यांनी हा चित्रपट 'खोटी माहिती पसरवणारा' म्हणत आरोप केला आहे की, याचा उद्देश 'केरळच्या प्रतिमेला नुकसान पोहोचवणे' और 'जातीय द्वेष पसरवणे' आहे.