पुढारी ऑनलाईन डेस्क : धक देवा बनून धुमाकूळ घालायला येतोय संजय दत्त. अभिनेता संजय दत्तचा आज २९ जुलै रोजी वाढदिवस आहे. तो सातत्याने साऊथच्या अनेक बड्या चित्रपटांचा भाग बनत आहे. दरम्यान, त्याच्या नव्या चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हायरल झाला आहे. त्याचा धांसू लूक शेअर करण्यात आले आहे. संजय दत्त आज त्याचा ६५ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्याचा आगामी चित्रपट केडी द डेव्हिलची पहिली झलक शेअर करण्यात आली आहे. ही त्या फॅन्ससाठी मोठी भेट आहे.
संजय दत्त साऊथचा चित्रपट ‘केडी-द डेविल’मध्ये दिसणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत ध्रुव सरजा असणार आहे. दिग्दर्शन प्रेम यांनी केले आहे. सोशल मीडियापर जारी करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये संजय दत्त एका विंटेज कारसमोर उभा आहे. डोक्यावर कॅप, हातात लाल काठी, गळ्यात बेल्ट, लेपर्ड प्रिंट शर्ट त्यावर डेनिम जॅकेट, काळी लुंगी, पायात बूट, मोठे मोठे केस आणि दाढी, डोळ्यांवर चष्मा आणि कपाळावर टिळा लावलेला संज दत्त दिसत आहे.संजय दत्तचा हा गेटअप पाहून तुम्हाला नक्कीच त्याच्या खलनायक चित्रपटाची आठवण देईल.
स्टार कास्टवर नजर टाकली तर ‘केडी-द डेविल’ मध्ये संजय दत्त आणि ध्रुव सरजा शिवाय, शिल्पा शेट्टी, नोरा फतेही, रमेश अरविंद, वी रविचंद्रन मुख्य भूमिकेत आहेत. पोस्टर रिलीज नंतर फॅन्स आता चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत.