मनोरंजन

Katrina Kaif : कॅटरिना बेबीबंप लपवतेय काय?; कॅज्युअल लूक व्हायरल

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ ( Katrina Kaif ) तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आली आहे. मात्र तिने व  तिचा पती विक्की कौशलने याबाबतची अधिकृत कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु, सध्या कॅटरिना विमान तळावर स्पॉट होताच तिचे बेबीबंप दिसले आहे. यानंतर मात्र, चाहत्यांनी कॅटरिना तिचे बेबीबंप लपवत असल्याचा कयास लावला आहे.

अभिनेत्री कॅटरिना कैफ ( Katrina Kaif )  नुकतेच मुंबईच्या विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी कॅटने पांढऱ्या रंगाची ट्रॅक पॅंन्ट आणि डेनिम जॅकेटमध्ये अगदी कॅज्युअल लूकमध्ये दिसली. हा व्हिडिओ विरल भयानी इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत कॅटरिना आलिशान कारमधून उतरून विमानतळाच्या गेटमधून आत जाताना दिसतेय. यावेळी तिच्यावर पॉपाराझींच्या कॅमेऱ्याची नजर पडलीय.

या व्हिडिओला लाल रंगाच्या हार्टचे ईमोजी शेअर करत कॅप्शन दिले आहे. यासेबत कॅटने चेहऱ्यावर मास्क आणि डोळ्यावर चष्मा परिधान केले आहे. हा व्हिडिओसा आतापर्यत जवळपास ३० हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहेत. हा व्हिडिओ हायरल होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने चक्क कॅटरिना तिचं बेबीबंप लपवत असल्याचे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका चाहत्याने कॅटरिना आगामी चित्रपटाच्या शुटिंगसाठी बाहेर जात असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

याशिवाय काही चाहत्यांनी तिच्या कॅज्युअल लूकचे कौतुक केलं आहे. यावरून कॅट प्रेंग्नट असल्याचा चाहत्यांनी अंदाज लावला आहे. परतु, कॅटने आणि विक्कीने प्रेग्नेंसीबद्दलची अधिकृत कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामिळे तिने प्रेग्नेंसीची माहिती लपवून ठेवल्याचे दिसतेय.

हेही वाचलंत का? 

(video : viralbhayani instagram वरून साभार)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT