Vicky Kaushal share Katrina first photo after becoming mother Instagram
मनोरंजन

Katrina Kaif-Vicky Kaushal |'नो मेकअप! ओन्ली ग्लो!' आई झाल्यानंतर कॅटचा पहिला फोटो, मॅरिज ॲनिव्हर्सरीला विकीचा खास संदेश

Katrina Kaif-Vicky Kaushal | 'नो मेकअप! ओन्ली ग्लो!' आई झाल्यानंतर कॅटरीनाचा पहिलाच फोटो, विकी कौशलची चौथी मॅरिज ॲनिव्हर्सरी

स्वालिया न. शिकलगार

कॅटरीना कैफचा आई झाल्यानंतरचा पहिला ‘नो मेकअप’ फोटो व्हायरल झाला असून तिच्या चेहऱ्यावरचा नैसर्गिक मातृत्वाचा ग्लो चाहत्यांना भुरळ घालत आहे. आजच विकी-कॅटच्या लग्नाचा चौथा वाढदिवस असल्याने हा फोटो अधिकच चर्चेत आला आहे.

Katrina first photo after becoming mother

कॅटरीना कैफ - विक्की कौशलची ९ डिसेंबर रोजी लग्नाचा वाढदिवस झाला. या खास औचित्याने विकीने कपल फोटो शेअर केला आहे. मुलाला जन्म दिल्यानंतर कॅटरीनाचा पहिलाच फोटो विकीने शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीच्या लव्हबर्ड कपलने २०२१ मध्ये ९ डिसेंबर रोजी राजस्थानातील सिक्स सेंस फोर्ट बर्वारा येथे राजेशाही लग्न केले होते. यावर्षी कपलच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण झाली. हा लग्नाचा वाढदिवस त्यांच्यासाठी खास ठरला आहे. कारण याचवर्षी दोघे पालक बनले आहेत. विक्की-कॅटने ७ नोव्हेंबर २०२५ रोजी बाळाचे स्वागत केले. त्या निमित्ताने विक्कीने कॅटसाठी सुंदर पोस्ट शेअर केली आहे.

विक्कीने लिहिलं, 'खुश आहे, आभारी आहे.'

वेडिंग ॲनिवर्सरीवर विक्की कौशलने इन्स्टाग्रामवर कॅटरीनासोबतचा खूप सुंदर फोटो शेअर केल्या आहेत. आई झाल्यानंतर पहिल्यांदाच कॅटरीनाची झलक दिसली. विक्कीने कॅप्शनमध्ये लिहिले, आजचा दिवस साजरा करत आहे... आनंदी, कृतज्ञ आणि झोपेची कमतरता. आम्हाला चौथ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

विक्की कौशलने पोस्टमध्ये म्हटलंय की, बाळाच्या जन्मानंतर त्याची आणि कॅटच्या जीवनात बदल झाले आहे. आई-वडिलाची जबाबदारी साकारताना सध्या झोप अपूर्ण आहे. पण तरीही ते खुश आहेत.

सेलेब्सने दिल्या शुभेच्छा

दुसरीकडे अन्य सेलेब्सकडून या कपलला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळत आहेत. नेहा धूपिया, हुमा कुरैशी सह सेलेब्सनी शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT