नागजिल्ला चित्रपटातून कार्तिक आर्यन 'नागराज' अवतारात दिसणार आहे Instagram
मनोरंजन

Kartik Aaryan Naagzilla Movie | 'नागिन' पाहिली! आता पाहा 'नागराज'; कार्तिक आर्यनची जबरदस्त एन्ट्री

Kartik Aaryan Nagraaj Role | 'नाग लोक का पहला कांड!' कार्तिक आर्यन 'नागराज' अवतारात

स्वालिया न. शिकलगार

Kartik Aaryan Naagzilla Movie

मुंबई : धर्मा मुव्हीजचा नवा चित्रपट 'नागजिल्ला' तुमच्या भेटीला येतोय. कार्तिक आर्यनने स्वत: इन्स्टाग्रामवर शेअर करून माहिती दिलीय की, नवा चित्रपट नवी कथा घेऊन येणार आहे. कार्तिक आर्यनच्या फॅन्ससाठी ही आनंदाची बातमी आहे. कार्तिकने इन्स्टावर मोशन पोस्टर शेअर करत म्हटले आहे - ''इन्सानो वाली पिक्चरे तो बहुत देख ली, अब देखो नागों वाली पिक्चर #𝐍𝐚𝐚𝐠𝐳𝐢𝐥𝐥𝐚 - नाग लोक का पहला कांड....फन फैलाने आ रहा हू..'' हा चित्रपट पुढील वर्षी नागपंचमीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याची माहिती त्याने दिलीय. (Kartik Aaryan Naagzilla Movie)

कार्तिक आर्यनच्या चित्रपटाची तारीख देखील फिक्स

कार्तिकने नागजिल्ला हा चित्रपट पुढील वर्षी येणार असल्याचे म्हटले आहे. 𝟏𝟒 𝐀𝐮𝐠𝐮𝐬𝐭 𝟐𝟎𝟐𝟔 अशी तारीख त्याने सांगितलीय. याआधी तो धर्माचा आणखी एक चित्रपट ‘तू मेरी मैं तेरा मध्ये दिसला होता. तर यावर्षी ‘आशिकी ३’ ऑक्टोबरमध्ये रिलीज होईल.

सोशल मीडियावर कॉमेंट्सचा वर्षाव

कार्तिकने मोशन पोस्टर रिलीज करताच सोशल मीडियावर कॉमेंट्स पाऊस पडल्याचे दिसते आहे. त्याचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. पुढील वर्ष फक्त कार्तिकचं असेल, असे एकाने म्हटले आहे. तर दुसऱ्या युजरने त्याला ऑल राऊंडर म्हटलं आहे. बिगेस्ट ब्लॉकबस्टर लोडिंग असेही तिसऱ्या युजरने म्हटले आहे. असंख्य चाहत्यांनी त्याला फायर आणि हार्ट इमोजी शेअर करून त्याचे स्वागत केले आहे. येणाऱ्या चित्रपटासाठी त्याला शुभेच्छा मिळताना दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT