Karishma Kapoor family  Instagram
मनोरंजन

Karishma Kapoor | ३० हजार कोटी संपत्ती वादाला तोंड फुटले असताना संजय कपूरच्या बहिणीचे करिश्माला जाहिरपणे समर्थन

Sunjay Kapur Property Karishma Kapoor |करिश्मा कपूरच्या पाठिशी ठाम उभी राहिली संजय कपूरची बहीण; ३० हजार कोटींच्या वादाने रंगली चर्चा

स्वालिया न. शिकलगार

Mandhira Kapur support to karishma kapoor

मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा माजी दिवंगत पती बिजनेसमॅन संजय कपूरच्या बहिणीचे वक्तवय समोर आले आहे. एकीकडे संजय कपूरच्या निधनानंतर ३०,००० कोटी रुपयांच्या उत्तराधिकार वादाला तोंड फुटले असताना, त्याची बहीण मंधिरा कपूरने करिश्मा कपूरच्या समर्थनार्थ जाहीरपणे भाष्य केले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेला मुलाखतीत, मंदिरा यांनी करिश्माला 'खूप चांगली आई' म्हटले आणि कुटुंबाला एकत्र ठेवल्याबद्दल आणि समायरा आणि कियान त्यांच्या आजी-आजोबांच्या जवळ राहिल्याबद्दल तिचे कौतुक केले आहे. ती म्हणाली, 'ती फक्त तिच्या मुलांची काळजी घेते, असे कोणत्याही आईने केले असते... आणि मी तिचे खरोखर कौतुक करते, कुटुंब अजूनही संपर्कात आहे आणि कायदेशीर कारवाई सुरू असूनही हे बंधन अबाधित राहावे अशी आशा करते.'

करिश्माची नणंद आज देखील आहे अभिनेत्रीच्या संपर्कात

रिपोर्टनुसार, जेव्हा करिश्माची नणंद मंदिराला विचारण्यात आलं की, काय ती संजय यांच्या मृत्यूनंतर करिश्माच्या संपर्कात आहे? तेव्हा मंदिराने उत्तर दिलं, "हो, नक्कीच. मला विश्वास आहे की, ती प्रिया सचदेवच्या देखील संपर्कात आहे. हेच सत्य आहे की, तिचे आमच्या सर्वांशी चांगले नात आहे. याचा अर्थ कौटुंबीक कलह नाहीये.''

'आईला मिळायला हवा हक्क'

मंदिराने पुढे म्हटले की, सर्वांना एक उपाय शोधायला हवा, ज्यामुळे कुटूंबाची जी प्रमुख असते म्हणजेच आई तिला तिचे स्थान नक्की मिळायला हवे. अखेर हम मुले आहोत. मग आमचे वय कितीही असो. मला वाटते की, आम्हाला केवळ शांती हवी. आम्ही आमच्या वडिलांच्या स्वप्नांना पुढे नेऊ इच्छितो..."

दरम्यान, संजय कपूर यांची आई राणी कपूर यांनी आरोप लावला होता की, त्यांची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT