टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका रोमँटिक व्हिडिओमध्ये करणने तेजस्वीला खास अंदाजात प्रपोज केल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडिओनंतर चाहत्यांमध्ये दोघांच्या लग्नाबद्दल उत्सुकता वाढली असून ‘तेजरण’ लवकरच लग्नबंधनात अडकणार का? अशी चर्चा रंगली आहे.
Karan Kundrra Proposes Tejasswi Prakash
टीव्ही विश्वातील सर्वात चर्चित आणि लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश. ‘बिग बॉस १५’मधून सुरू झालेली त्यांची प्रेमकहाणी आजही चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आता पुन्हा एकदा हे दोघे सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. कारण ठरला आहे करण कुंद्राचा रोमँटिक ‘Dream Proposal’ व्हिडिओ!
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये करण कुंद्रा अत्यंत खास आणि रोमँटिक अंदाजात तेजस्वी प्रकाशला प्रपोज करताना दिसत आहे. सुंदर सजावट, रोमँटिक वातावरण आणि करणचा खास अंदाज पाहून व्हिडिओवर अभिनंदनाचा पाऊस पडला आहे. तेजस्वीच्या चेहऱ्यावरचं स्मित आणि दोघांमधील केमिस्ट्री चाहत्यांना खूपच आवडली आहे.
करण आणि तेजस्वी यांची जोडी चाहत्यांमध्ये ‘तेजरण’ नावाने प्रसिद्ध आहे. बिग बॉसच्या घरात सुरू झालेलं त्यांचं नातं कार्यक्रम संपल्यानंतरही अधिक घट्ट झालं. अनेकदा दोघे एकत्र फिरताना, पार्टी करताना किंवा खास क्षण साजरे करताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या लग्नाबद्दलच्या चर्चा कायम रंगत असतात.
जेव्हा करणने विचारलं- Will You Marry Me?
करण कुंद्राने गुडघ्यावर बसून तेजस्वी प्रकाशला प्रपोज केलं. यावेळी तेजस्वीच्या डोळ्यांत अश्रू तराळले. ती भावूक झालेली दिसली. गेल्या चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेली ही जोडी लवकरच लग्न करेलं, असा अंदाज बांधला जात आहे. या प्रपोजलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटफ्लिक्सवरील Desi Bling या शोमधील एका क्लिपमध्ये करण कुंद्रा मोठ्या डायमंड रिंगसह तेजस्वीला अतिशय रोमँटिक अंदाजात प्रपोज करताना दिसतो.
video - thmary insta वरून साभार
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला असून, आता त्यांच्या लग्नाची उत्सुकता आणखी वाढली आहे. करण कुंद्राने दुबईतील वाळवंटात हा खास क्षण आनंदात घालवला. खरंतर करण-तेजस्वी सध्या दुबईत रिॲलिटी शो ‘देसी ब्लिंग' शूट करत आहेत. पण याचवेळी करणने सर्वांसमोर आपलं प्रेम व्यक्त करण्याचा निर्णय घेतला.
व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये वाळवंटात खूपच सुंदर रॉयल सेटअप दिसत आङे. आधीपासून करणने सर्व तयारी केली होती. करणने गुडघ्यावर बसून अंगठीचा बॉक्स उघडला, ते पाहून तेजस्वीला आश्चर्याचा धक्का बसला. ती रडू लागली. करणने तिला डायमंड अंगठी घातली.
प्रपोजल वेळी तेजस्वी खूपच भावूक झाली. तिच्या डोळ्यात अश्रू तराळले. फोटोंमध्ये करण तिला सांभाळताना आणि हसून शांत करताना दिसला. हे सुंदर क्षण अनुभवताना करणने आपल्या लेडी लव्हला किस देखील केलं. फॅन्सना या दोघांची रोमँटिक केमिस्ट्री पसंतीस पडली. सोशल मीडियावर या ड्रीम प्रपोजलची चर्चा सुरु झाली आहे.