मनोरंजन

Karan Kundra : ‘तेरे इश्क में घायल’ चर्चेतील करण कुंद्राच्या आगामी प्रोजेक्ट्सची प्रतीक्षा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनोख्या भूमिका साकारून फॅशन गेम सेट करणारा अभिनेता म्हणजे अभिनेता करण कुंद्रा ! (Karan Kundra) फॅशन आऊटिंग असो किंवा स्टाईल अवॉर्ड्स करण नेहमीच चर्चचा विषय ठरला आहे. 'तेरे इश्क में घायल' मुळे करण कुंद्रा चर्चेत आहे. आता त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची प्रतीक्षा सर्वांना लागून राहिली आहे. (Karan Kundra)

त्याच्या अनोख्या कामाच्या आलेखाने तो पुढील काळात काय भूमिका साकारणार आहे, याची सगळ्यांना उत्सुकता आहे. हिंदी इंडस्ट्रीतमधील एका उद्योगाचे स्त्रोताने या अभिनेत्याबद्दल काहीतरी खास गोष्ट शेअर केली आहे. अगदी थोड्याच कालावधीत करणने संपूर्ण इंडस्ट्रीत स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं आहे. येणाऱ्या काळात तो नक्कीच काहीतरी आव्हानात्मक भूमिका साकारणार असल्याचं समजतंय.

येणाऱ्या वर्षात करण अनेक नवीन प्रोजेक्ट्स करणार असल्याचं समजतंय. करण त्याच्या भूमिकेच्या पलिकडे जाऊन काहीतरी वेगळं करणार आहे. करण या वर्षात "बिगर पिक्चर" करणार आहे.

करण सध्या 'तेरे इश्क में घायाल' हा प्रोजेक्ट करतोय जो प्रेक्षकांमध्ये सर्वात बिग हिट ठरत आहे. बिग बॉस, लॉक अप आणि डान्स दिवाने यांसारख्या रिअॅलिटी शोचाही तो भाग आहे. करणने सर्व माध्यमांमध्ये काम केले आहे आणि अतुलनीय कामगिरीसाठी तो प्रत्येक शोमध्ये चमक दाखवून गेला. बेचारी, बारिश आयी है, आणि कमले या म्युझिक व्हिडिओमध्‍ये देखील दिसला. या म्युझिक व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. सोबतीच करण अनेक बिग बजेट चित्रपटांचाही भाग झाला आहे. त्याच्या नावावर '१९२१' हा सोलो हिट देखील आहे.

करणचे चाहते त्याच्या पुढच्या भूमिकेसाठी नक्कीच उत्सुक आहेत. करण मोठ्या पडद्यावर दिसणार का ? कोणत्या नव्या भूमिकेसाठी करण काम करणार अशा अनेक गोष्टींचा उलगडा लवकरच सगळ्यांना होणार आहे, असे समजते.

SCROLL FOR NEXT