Kantara Chapter 1 box office collection updates
मुंबई - होम्बले फिल्म्स आणि ऋषभ शेट्टीचा 'कांतारा: चॅप्टर १' ने जगभरात चित्रपटगृहात धुमाकूळ घातला आहे. २०२२ मध्ये रिलीज झालेला ब्लॉकबस्टर चित्रपट कांताराच्या या प्रीक्वलने प्रेक्षकांची मने जिंकली आहे.
दमदार अभिनयाने सजलेल्या चित्रपटाची कहाणी प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवणारी आहे. मंत्रमुग्ध करणारी दृश्ये, प्रभावी डायलॉग्ज आणि सुपर डायरेक्शनने सर्वांना वेड लावंल आहे. बॉक्स ऑफिसवर कोटींचे कलेक्शन करणाऱ्या या चित्रपटाने रिलीजच्या केवळ दोन आठवड्यातच जगभरात ७१७.५० कोटींची रेकॉर्डतोड कमाई केली आहे.
आता प्री-दिवाळी वीकेंडमध्ये देखील धमाकेदार कमाई करण्यासाठी हा चित्रपट तयार आहे. त्याचबरोबक दिवाळीच्या सुट्ट्यांचा भरपूर फायदा चित्रपटाला होणार आहे.
निर्मात्यांनी सोशल मीडियावर लिहिलं- बॉक्स ऑफिसवर एक दिव्य तुफान KantaraChapter1 जगभरात ७१७.५० कोटींचे GBOC पार केले आहे. या दिवाळीत BlockbusterKantara सोबत उत्सव साजरा करा..."
चित्रपटात ऋषभ शेट्टी, सप्तमी गौडा, गुलशन देवैया, रुक्मिणी वसंत, जयराम, पीडी सतीश चंद्र, प्रकाश थुमिनाड आणि अन्य प्रतिभाशाली कलाकारांटच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा, दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका ऋषभ शेट्टीची आहे. हा चित्रपट विजय किरागंदूर द्वारा होम्बले फिल्म्सच्या बॅनर अंतर्गत निर्मित आहे.
सिनेमॅटोग्राफी अरविंद एस. कश्यपने केली आहे. संगीत बी. अजनिश लोकनाथ यांचे आहे. पहिल्या चित्रपटामध्येही यांनीच संगीत दिलं होतं.