Kantara Chapter 1 advance booking
मुंबई - बहुप्रतीक्षित कांतारा चॅप्टर १ च्या रिलीजची उत्सुकता ऋषभ शेट्टीच्या फॅन्सना लागून राहिलीय. 'कांतारा चॅप्टर १' रिलीजसाठी तयार आहे. चित्रपटाच्या रिलीजला केवळ एक दिवस शिल्लक आहे. २ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. तत्पूर्वी चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकींगला मिळालेला अफाट प्रतिसाद सध्या बझ आहे. रिलीजच्या काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाने कोटींची कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.
‘कांतारा’ फ्रेंचायजीच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली होती. त्या चित्रपटातील लोककथा, दैवभक्ती आणि ऋषभ शेट्टीच्या दमदार अभिनयामुळे तो सर्वत्र हिट ठरला. आता ‘कांतारा चॅप्टर १’ या प्रीक्वेलला प्रेक्षकांची जबरदस्त उत्सुकता आहे. त्यामुळेच तिकिट बारीवर पुन्हा गर्दी उसळली आहे.
सिनेमास्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘कांतारा चॅप्टर १’ ने रिलीजपूर्वीच कोट्यवधींचे ॲडव्हान्स बुकींग केले आहे. हा आकडा काही मोठ्या हिंदी आणि दक्षिणेकडील बिग बजेट चित्रपटांनाही मागे टाकणारा आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने अनेक मल्टीप्लेक्स चेन आणि सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये हाऊसफुल्ल बोर्ड लावले आहेत.
ऋषभ शेट्टीने स्वतः या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. त्याने या चित्रपटात प्राचीन लोककथा आणि अध्यात्मिक परंपरांचा संगम घडवून आणला आहे.
किरकोळ बजेटमध्ये बनलेल्या कांतारा चित्रपटाची ४०० कोटींची कमाई झाली होती. आता ‘कांतारा चॅप्टर १’ कन्नडसह हिंदी, तमिळ, तेलुगु, बंगाली, मल्ळलम, इंग्लिश, स्पॅनिशमध्ये देखील एकावेळी रिलीज केल जात आहे. त्यामुळे चित्रपटाचा ग्लोबली काय आणि किती प्रभाव पडेल, हे चित्रपट पाहिल्यानंतर कळेल.
‘कांतारा चॅप्टर १’ रिलीजच्या दिवशी म्हणजेच २ ऑक्टोबरच्या पूर्वसंध्येपर्यंत ॲडव्हान्स बुकिंगने तब्बल १२ कोटींची कमाई करण्यात आलीय. कन्नड पट्ट्यात तब्बल ७.५० कोटींहून अधिक कमाई केली आहे. हिंदी पट्ट्यात ॲडव्हान्स बुकिंग वाढताना दिसत आहे. आतापर्यंत २ कोटींचा ॲडवहान्स गल्ला जमवला आहे.
ऋषभ शेट्टीच्या या चित्रपटातील नवे गाणे ‘रिबेल’ रिलीज झाले आहे. हे गाणे पंजाबी गायक दिलजीत दोसांझने गायले आहे. दिलजीत या गाण्यात पड्यावर दिसेल. गाण्यात दिलजीत - ऋषभ शेट्टी दोघे ढोल वाजवताना दिसत आहेत.