इमरजन्सी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज  x account
मनोरंजन

Emergency Trailer | इंडस्ट्रीने मला बायकॉट केलं, संघर्षात बनवला 'इमरजन्सी'; कंगना भावूक

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : इमरजन्सी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला. यावेळी कंगना रनौत भावूक झाली. ती म्हणाली, माझ्यासाठी आजचा दिवस खूप इमोशनल करणारा आहे. मी हा चित्रपट बनवण्यासाठी खूप कठीण परिस्थितींचा सामना केला आहे. शूटिंगवेळीदेखील अनेक गोष्टी होत्या, ज्यामुळे खूप त्रास झाला.

अभिनेत्री, खासदार कंगना रनौतचा 'इमरजन्सी' १५ ऑगस्टला रिलीज होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. कंगना, या चित्रपटात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसेल. भारतात १९७५ मध्ये आणीबाणी वेळची कहाणी चित्रपटात दाखवण्यात येईल.

कंगना रनौत भावूक

ट्रेलर लॉन्चवेळी बोलताना कंगना भावूक झाली. ती म्हणाली, माझ्यासाठी आजचा दिवस खूप भावूक करणारा आहे. मी हा चित्रपट बनवण्यासाठी खूप कठीण परिस्थितींचा सामना केला. शूटिंगवेली अशा अनेक गोष्टी होत्या, ज्यामुळे खूप त्रास सहन करावा लागला. सर्वांना माहिती आहे की, इंडस्ट्रीने मला पूर्णपणे बायकॉट केलं आहे. कुणीही मला पाठिंबा दिला नाही. पण, चित्रपटातीत जी स्टार कास्ट तुम्हाला दिसत आहे, त्यांनी माझी साथ कधीच सोडली नाही.

कंगना म्हणाली - आपणास माहिती आहे की, मला राजाकारणावर चर्चा करायला आवडतं. 'इमरजन्सी', प्रत्येकासाठी इन्फॉर्मेटिव्ह चित्रपट असणार आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट पाहणे आवडेल. हा चित्रपट मनोरंजक ठरेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT