Kangana Ranaut reactions on Jaya Bachchan video
मुंबई - अभिनेत्री, खासदार जया बच्चन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येतात. आता देखील त्या एका व्हिडिओ मुळे चर्चेत आल्या आहेत. तो व्हिडिओ इतका व्हायरल होत आहे की, कंगना रनौत यांनीही यावर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. नेमकं प्रकरण काय आहे?
व्हिडिओमध्ये दिसतं की, जया बच्चन कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये एका व्यक्तीवर भडकतात आणि त्याला धक्का देतात. यावर कंगनाची प्रतिक्रिया समोर आलीय.
ही घटना पहिल्यांदा घडलेली नाही. कधी घराबाहेर पापराझींवर ओरडताना तर कधी विमानतळावर भडकताना जया बच्चनचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आता कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये एक व्यक्ती त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्यावर जया बच्चन भडकतात. आणि त्याला त्या धक्का मारतातत.
जया बच्चन यांच्या वागणुकीवर त्यांनी नाराजी जाहीर केली. कंगना रनौत यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर जया बच्चन यांचा व्हिडिओ शेअर लिहिले - 'सर्वात बिघडलेली आणि विशेषाधिकार प्राप्त महिला. लोक यांना फक्त यासाठी सहन करतात कारण त्या अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आहेत...किती अपमानजनक आणि लज्जास्पद बाब आहे.