Kangana Ranaut On Girija Oak pudhari photo
मनोरंजन

Kangana Ranaut On Girija Oak |'अपने खुबसुरती का इस्तेमाल करो', 'नॅशनल क्रश'च्या प्रश्नावर मिश्किल उत्तर, गिरीजाच्या सौंदर्यावर कंगना फिदा

'अपने खुबसुरती का इस्तेमाल करो', गिरीजाच्या सौंदर्यावर कंगना फिदा; 'नॅशनल क्रश'च्या 'या' प्रश्नावर अभिनेत्रीचे मिश्किल उत्तर

स्वालिया न. शिकलगार

अभिनेत्री गिरीजा ओक आणि कंगना रनौत यांच्यातील एक मजेशीर संवाद सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ‘नॅशनल क्रश’बाबत विचारलेल्या प्रश्नावर कंगनाने मिश्किल अंदाजात प्रतिक्रिया देत गिरीजाच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले. “तुझ्या सौंदर्याचा वापर कर,” असे म्हणत तिने वातावरण हलकेफुलके केले. कंगनाच्या या उत्तरामुळे सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

Kangana Ranaut’s Playful dig On Girija Oak’s ‘National Crush’ online Tag

अभिनेत्री गिरीजा ओक सध्या एका व्हायरल पॉडकास्ट क्लिपमुळे 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखली जात आहे. या अनपेक्षित प्रसिद्धीवर भाष्य करताना गिरीजा म्हणाली की, तिने ही बाब कधीच स्वतःचे यश मानले नाही. तिने या स्तुतीचे पूर्ण श्रेय तिच्या नैसर्गिक सौंदर्याला आणि अनुवंशिकतेला दिले. इतकेच नाही तर नॅशनल क्रश टॅग मिळालेल्याचे प्रमाणपत्र नक्की कुठे मिळते असे गिरीजाने विचारले, तेव्हा खूप मिश्किलपणे कंगना रनौतनी तिला उत्तर दिले आहे, जे खूप व्हायरल होत आहे.

अभिनेत्री गिरीजा ओक हिने एका व्हायरल पॉडकास्ट क्लिपबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले. त्याच क्लिपमुळे तिला नॅशनल क्रश हा टॅग मिळाला होता. ही अनपेक्षित प्रसिद्धी मिळाल्याबद्दल गिरीजा म्हणाली की, तिने या गोष्टीला कधीच आपली वैयक्तिक कामगिरी मानले नाही. उलट, या स्तुतीचे श्रेय तिने आपल्या नैसर्गिक सौंदर्याला आणि अनुवंशिकतेला दिले. आफल्या कोणत्याही कर्तृत्वाला नाही.

'अपने खुबसुरती का इस्तेमाल करो'

मात्र, दुसरीकडे 'भारत भाग्य विधाता' या चित्रपटातील तिची सहअभिनेत्री कंगना रणौत यांनी तिला मिश्किल प्रतिक्रिया दिली. एका मुलाखतीदरम्यान गिरीजाची चेष्टा करत कंगना म्हणाल्या, 'अपने खुबसुरती का इस्तेमाल करो.' तसेच त्या पुढे म्हणाल्या की, आमच्या चित्रपटाचाही प्रचार कर ना', या प्रतिक्रियेनंतर कंगनाचे स्टेटमेंट व्हायरल होतेय.

'नॅशनल क्रश' असल्याबद्दलचे प्रमाणपत्र नक्की कुठे मिळते?

गिरीजा गमतीने म्हणाली, अशा ऑनलाईन पदव्या कुठे मिळतात. 'नॅशनल क्रश' असल्याबद्दलचे प्रमाणपत्र नक्की कुठे मिळते. कंगनाही आनंदाने म्हणाल्या की, गिरीजाची लोकप्रियता अविश्वसनीय आहे. आगामी चित्रपटात तिच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद देखील व्यक्त केला.

कंगना रणौत सध्या त्यांचा आगामी चित्रपट 'भारत भाग्य विधाता'च्या प्रसिद्धीमध्ये बिझी आहे. यामध्ये तिच्यासोबत सह-कलाकार गिरीजा ओक आणि स्मिता तांबे देखील आहेत. एका मुलाखतीमध्ये या तिन्हीही अभिनेत्रींना त्यांच्या मनात नेमके काय विचार सुरू आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा स्मिता तांबेने उत्तर दिले की, 'माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात सतत हाच विचार सुरू असतो की, माझ्या मुलीने वेळेवर झोप घेतली आहे की नाही. कारण जर ती उशिरा झोपली, तर ती उशिराच उठेल.. एक आई २४ तास कार्यरत असते; किंबहुना, २४ नाही तर ४८ तास कार्यरत असते.'

कंगना म्हणाली की, 'स्मिताची मुलगी सेटवर यायची आणि तिथेच खेळायची. सेटवर मुलांसाठी म्हणून एखादी स्वतंत्र खोली (प्ले-रूम) का नसते?' कंगना पुढे महणाल्या.'आता तर खुद्द सरकारही आरक्षणाच्या माध्यमातून महिलांनी नोकरी-व्यवसायात सहभागी व्हावे, अशी अपेक्षा करत आहे. परंतु, महिलांसाठी हे खूप कठीण ठरेल आणि त्यांना कुटुंब आणि करिअर यांपैकी एकाची निवड करण्यास भाग पाडले जाईल. महिलांना खरोखरच खूप मोठ्या पाठिंब्याची गरज आहे.'

गिरीजानेही कंगनाच्या मताशी सहमती दर्शवत म्हटले की, 'कुटुंब आणि करिअर यांपैकी एकाची निवड करण्याची वेळ महिलांवर येता कामा नये. ही खरोखरच दुर्दैवी आहे.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT