इमरजन्सी २०२४ मध्ये नाही तर जाणून घ्या कधी होणार रिलीज! instagram
मनोरंजन

Emergency New Release Date : कंगना रनौत यांच्या इमरजन्सी नवी रिलीज डेट जारी

इमरजन्सी २०२४ मध्ये नाही तर जाणून घ्या कधी होणार रिलीज!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : कंगना रनौतच्या इमरजन्सी चित्रपटाची नवी रिलीज डेट जारी करण्यात आली आहे. कंगना यांच्या फॅन्ससाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते. कंगनाचा चित्रपट इमरजन्सी आता २०२४ मध्ये रिलीज होणार नाही. हा चित्रपट १७ जानेवारी, २०२५ मध्य़े रिलीज केला जाईल. सेन्सॉरकडून या चित्रपटाला मंजुरी देखील मिळाली आहे. ही कहाणी १९७० च्या दशकातील आहे. जेव्हा देशात आणीबाणी जाहीर केली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन कंगना रनौत यांचे आहे. शीवाय चित्रपटात त्या इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहेत.

ही आव्हानात्मक भूमिका साकारणे कंगनासाच्या करिअरमधील सर्वात महत्वाकांक्षी प्रोजेक्ट पैकी एक आहे. सोशल मीडियावर फॅन्स सोबत अपडेट शेअर करत कंगनाने लिहिलं- ‘देशाची सर्वात शक्तिशाली महिलेची महागाथा आणि ते क्षण ज्याने भारताची निती बदलली. इमरजन्सी, चित्रपटगृहात १७ जानेवारी २०२५ ला.'

चित्रपटामध्ये अनुपम खेर, महिमा चौधरी, मिलिंद सोमन, श्रेयस तळपडे, विशाक नायर आणि दिवंगत सतीश कौशिकसहि अनेक कलाकार आहेत. जी स्टुडियोज, मणिकर्णिका फिल्म्स आणि रेनू पिट्टीद्वारा निर्मित, इमरजन्सीमध्ये संचित बलहारा आणि जी. व्ही. प्रकाश कुमार यांचे संगीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT