Instagram
मनोरंजन

Kamali Vijaya Babar | भर उन्हात घाटात बसच्या टॉपवर विजया बाबरचं २२ तास शूट

मी सलग २२ तास शूट केलं - विजया बाबर

स्वालिया न. शिकलगार

Kamali Vijaya Babar 22 hours shooting for tv serial

मुंबई - झी मराठीवरील नवीन मालिका कमळीमधून अभिनेत्री विजया बाबर एक वेगळ्या धाटणीचं आणि सशक्त पात्र साकारत आहे. कमळी ही एका खेड्यातून आलेल्या मुलीची कथा आहे, जी शिक्षणासाठी आणि आत्मसन्मानासाठी संघर्ष करते. विजयाशी झालेल्या खास संवादात, तिनी भूमिकेबद्दलचं आपलं अनुभव आणि तयारी शेअर केली आहे.

ती म्हणाली, "कमळीचा पहिला प्रोमो आम्ही वाईला शूट केला. सलग २२ तास आम्ही शूट केलं. पण खूप मज्जा आली सर्व टीमचा उत्साह तितकाच होता. ट्रॅव्हलिंग शॉट खूप असल्यामुळे वेगळ्यावेगळ्या ठिकाणी जाऊन ते घ्यावे लागत होते. बस वरचा जो शॉट आहे तो आम्ही भर उन्हात घाटावर शूट केला, मी २ तास त्या बसच्या टपावरच होते. कमळीसाठी माझी निवड कशी झाली याचा किस्सा सांगायचं झाला तर. मला मोशन प्रोडूक्शन्स मधून कॉल आला होता ऑडिशनचा विडिओ पाठवण्यासाठी त्यांनी सांगितले की, आम्ही एक नवीन मालिका करत आहोत, मला भूमिके बद्दल माहिती दिली. जेव्हा कॉल आला तेव्हा मी जत्रेसाठी गावी गेले होते आणि मी आमच्या गावच्या देवीला बोलले होती की, आता काहीतरी छान घडूदे आणि हे मी बिलकुल अतिशयोक्ती बोलत नाही, पण ज्यादिवशी जत्रा होती.

त्याच दिवशी मला कॉल आला होता. मी दादा कडून आमच्या गावच्या टेरेसवरती जाऊन ऑडिशन शूट करून पाठवली. नंतर जेव्हा मुंबईला आले तेव्हा सेटवर बोलवून बरेच लुक टेस्ट करून लुकमध्ये पुन्हा ऑडिशन्स झाल्या. मला प्रेरणादायी भूमिका साकारायला खूप आवडतात. प्रेक्षकांना काही तरी प्रेरणा मिळेल माझ्या भूमिकेतून आणि ते त्यांची स्वप्नपूर्ण करण्यासाठी जागरूक होतील याचा मला आनंद होईल. प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि पहिल्या प्रोमो पासून सर्वांच म्हणणं होत कि खूप सुंदर शूट झालाय पहिल्या प्रोमो मधेच मालिकेला काय संदेश द्यायचा होता तो ही छान प्रकारे मांडला गेला आहे.

कमळी एक अशी मुलगी आहे जिची शिक्षण घेण्यासाठीची सर्व धडपड आहे. कोल्हापूर मधलं एक गाव आहे सिद्धटेक तिथली आहे कमळी, त्या गावात मुलींची लहानपणीच लग्न होतात ज्यामुळे त्यांना पुढे शिक्षण घेता येत नाही. पण कमळीला शिकायचंय, काहीतरी बनायचंय आणि त्यासाठी तिला मुंबईला जायचं आहे. या करिता तिची सर्व धडपड सुरु आहे. आपण जेव्हा जिद्दीने एखादी गोष्ट करतो तेव्हा त्यासाठी जी मेहनत करावी लागेल त्याची पूर्ण तयारी करतो. तर अशी आहे कमळी. प्रेरणादायी, जिद्दी, बिंधास्त, सर्वाना आवडणारी, आणि स्वप्नांसाठी लढणारी. मालिकेसाठी शूट करायला खूप मज्जा येते. सेटवर माझी सर्वात आधी मैत्री योगिनी ताईशी झाली. आमची लूकटेस्टच्या वेळी भेट झाली आणि तेव्हाच मला कळले की, ती माझ्या आईची भूमिका करत आहे. पहिल्या प्रोमोला आम्ही एकत्र शूट केले तेव्हाच आमचं ट्युनिंग छान जुळलं. आम्ही दोघी मेकअप रूम ही शेयर करतो. तिचा स्वभाव खूप गोड आहे. आणि बाकीच्यांशी हळू हळू मैत्री होत आहे.”

प्रेक्षकांना मी हेच सांगेन की सर्वांमध्ये एक कमळी दडली आहे. कित्येक जण आपली स्वप्न मानत ठेवतात आणि ती पूर्ण करण्यासाठी एक प्रेरणा शोधत असतात, तर त्या सर्वांसाठी कमळी एक प्रेरणा आहे. ती मला ही प्रेरणा देत आहे की आपण आपल्या स्वप्नांसाठी लढून, मेहनतीने आणि जिद्दीने ती पूर्ण करू शकतो.

'कमळी' दररोज रात्री ९:०० वा. झी मराठीवर पाहता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT