सुपरस्टार प्रभास 
मनोरंजन

‘कल्की 2898 AD’मधील प्रभासची झलक समोर, ट्रेलरची उत्सुकता

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथचा सुपरस्टार प्रभास, बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि बिंग बी अमिताभ बच्चन यांचा आगामी 'कल्की 2898 AD' लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. यामुळे प्रभासचे चाहते चित्रपटासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. याच दरम्यान प्रभासने चाहत्यांना खूशखबर दिली असून त्याची चित्रपटातील पहिली झलक समोर आणली आहे. यासोबत चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज डेटही समोर आली आहे.

साऊथ अभिनेता प्रभासने नुकतेच त्याच्या इन्स्टाग्रामवर आगामी 'कल्की 2898 AD' चित्रपटातील पहिली झलक शेअर केली आहे. या पोस्टरमध्ये प्रभास मातीच्या ढिगाऱ्यावर उभारलेला दिसत आहे. यासोबत त्याच्या भोवती उंच इमारती दिसत आहेत. या पोस्टरवर चित्रपटाचा ट्रेलर १० जूनला रिलीज होणार असल्याची माहित मिळतेय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये प्रभासने लिहिलं आहे की, "सर्व काही बदलणार आहे., भविष्यातील एक चित्रपट 'कल्की 2898 AD' अनावरण करत आहे. ट्रेलर १० जूनला रिलीज होणार आहे."

प्रभासचा हा फोटो सोशल मीडियावर व्होयरल होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव करत आहेत. दरम्यान एका यूजर्सने लिहिलंय आहे की, "या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत." तर दुसऱ्या युजर्सने लिहिले की, "जग तुझी आतुरतेने वाट पाहत आहे प्रभास." यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत.

प्रभास, दीपिका पादुकोण आणि अमिताभ बच्चनसोबत या चित्रपटात अभिनेता कमल हासन आणि बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी, मौनी रॉय दिसणार आहे. हा चित्रपट २७ जून २०२४ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे एकूण बजेट ६०० कोंटीचे आहे. या चित्रपटाची कथा 'महाभारत' पासून सुरू होणार आहे. यामध्ये ६,000 वर्षांचा काळ दाखविण्यात येणार आहे. नाग अश्विन यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. अमिताभ बच्चन यांनी 'अश्वत्थामा'ची भूमिका साकारताना दिसणार आहेत. तर प्रभास आणि दीपिका पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT