Kaattaan OTT Release Pudhari
मनोरंजन

Kaattaan: देव की राक्षस? नवीन क्राईम थ्रिलर सिरीज ओटीटीवर; विजय सेतुपतीचा धमाका, सस्पेन्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Kaattaan OTT Release: ‘काट्टान’ ही विजय सेतुपतीची सस्पेन्सने भरलेली क्राइम थ्रिलर सिरीज OTT वर रिलीज झाली आहे. एका रहस्यमय खुनाच्या तपासाभोवती फिरणारी ही कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवते.

पुढारी वृत्तसेवा

Kaattaan OTT Release: ओटीटीवर क्राइम थ्रिलर सिरीज आली आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आणि शेवटपर्यंत सस्पेन्स कायम ठेवणारी 'काट्टान' ही वेब सिरीज सध्या चर्चेत आहे. विशेष म्हणजे या सिरीजमध्ये विजय सेतुपती मुख्य भूमिकेत दिसत असून त्याच्या अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांना वेड लावलं आहे.

ओटीटीवर ‘काट्टान’ची एंट्री

‘काट्टान’ ही सिरीज 27 मार्च 2026 रोजी JioHotstar वर रिलीज झाली आहे. वीकेंडसाठी एकदम परफेक्ट अशी ही डार्क क्राइम थ्रिलर सिरीज मानली जात आहे.

किती एपिसोड आणि कोणत्या भाषांमध्ये?

या सिरीजचा पहिला सीझन 10 एपिसोडचा आहे. प्रेक्षकांना ही सिरीज तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, हिंदी, मराठी आणि बंगाली अशा अनेक भाषांमध्ये पाहता येते.

दमदार स्टारकास्ट

या सिरीजचं दिग्दर्शन एम. मणिकंदन आणि बी. अजितकुमार यांनी केलं आहे. मुख्य भूमिकेत विजय सेतुपतीसोबत मिलिंद सोमण, सुदेव नायर, कलैवाणी भास्कर, मुथुकुमार, वी.जे. पार्वती, रिशा जेकब्स आणि वडिवेल मुरुगन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

‘काट्टान’ची कथा नेमकी काय आहे?

या सिरीजची कथा मुथु (विजय सेतुपती) या पात्राभोवती फिरते. मुथु हा नेमका कोण? देव की राक्षस... हा प्रश्न संपूर्ण कथेत प्रेक्षकांना सतावत राहतो. कथेची सुरूवात ही पोलीस स्टेशनजवळ एक कापलेलं डोकं सापडतं इथून होते. या घटनेपासून एक गूढ आणि थरारक तपास सुरू होतो. ही कथा एका गावात घडते आणि यात पर्यावरणाशी संबंधित मुद्दे आणि गुन्हेगारी यांचा संगम दाखवण्यात आला आहे.

सस्पेन्सने भरलेली थरारक सिरीज

‘काट्टान’ ही फक्त क्राइम सिरीज नाही, तर ती एक सायकोलॉजिकल थ्रिलर सिरीज आहे जी प्रत्येक एपिसोडमध्ये नवा ट्विस्ट आणते. प्रेक्षकांना शेवटपर्यंत काय होणार याची उत्सुकता कायम ठेवण्यात ही सिरीज यशस्वी ठरते.

जर तुम्हाला सस्पेन्स, थ्रिल आणि वेगळ्या कथानकाच्या सिरीज आवडत असतील, तर ‘काट्टान’ नक्की पाहण्यासारखी आहे. देव आणि राक्षस यांच्यातली सीमारेषा धूसर करणारी ही सिरीज तुम्हाला विचार करायला भाग पाडते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT