दक्षिण भारतीय सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर याला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी उसळल्याची घटना समोर आली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी हजारो चाहते जमा झाल्याने परिस्थिती काही काळ नियंत्रणाबाहेर गेली. गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि काही ठिकाणी लाठीचार्ज केल्याची माहिती मिळत आहे.
Jr NTR Hospitals inaugration in Bengaluru
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणजे ज्युनिअर एनटीआर. आपल्या दमदार अभिनय, उत्कृष्ट नृत्य आणि अॅक्शनमुळे त्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. तेलुगू चित्रपटसृष्टीत त्याला “मॅन ऑफ मासेस” असेही म्हटले जाते. त्याला पाहण्यासाठी बेंगलुरुमध्ये प्रचंड गर्दी झाली. गर्दी नियंत्रणात न आल्याने पोलिसांना लोकांवर लाठीचार्ज करावा लागल्याचे वृत्त समोर आले आहे.
ज्युनियर एनटीआर एका सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी बेंगलुरुमध्ये ८ मार्चला पोहोचला. त्याची एक झलक पाहण्यासाठी अलोट गर्दी रुग्णालयाबाहेर झाली. त्याने आपल्या गाडीतून हात उंचावून सर्वांना अभिवादने देखील केले. पण तेव्हाच मोठा गदारोळ झाला. गर्दी नियंत्रणाबाहेर जात असल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेव्हा तो रुग्णालयात पोहोचला तेव्हा परिसरात प्रचंड गर्दी झाली. लोकांनी एस्केलेटर देखील तोडले. इमारतीत गोंधळ झालेला पाहायला मिळाला.
ज्युनियर एनटीआरला त्या गर्दीतून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. रिपोर्ट्सनुसार, अनियंत्रित गर्दी पाहून पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
ज्युनिअर एनटीआरचे लोकप्रिय चित्रपट
Student No.1 (2001)
Aadi (2002)
Simhadri (2003)
Yamadonga (2007)
Adhurs (2010)
Brindavanam (2010)
Temper (2015)
Nannaku Prematho (2016)
Janatha Garage (2016)
Jai Lava Kusa (2017)
Aravinda Sametha Veera Raghava (2018)
RRR (2022)
war 2 (2025)
या चित्रपटांपैकी अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठे विक्रम केले आहेत. विशेषतः RRR या चित्रपटामुळे त्याला जागतिक स्तरावर मोठी ओळख मिळाली.
ज्युनिअर एनटीआर विषयी ...
ज्युनिअर एनटीआरचा जन्म २० मे १९८३ रोजी झाला. लहानपणापासूनच त्याला अभिनय आणि नृत्याची आवड होती. त्याने बालकलाकार म्हणूनही काही चित्रपटांमध्ये काम केले होते. मात्र मुख्य अभिनेता म्हणून त्याची कारकीर्द २००१ मध्ये ‘Student No.1’ या चित्रपटातून सुरू झाली. या चित्रपटामुळे त्याला अधिक लोकप्रियता मिळाली. त्यानंतर आलेला ‘Aadi’ आणि ‘Simhadri’ हे चित्रपट प्रचंड हिट ठरले. या चित्रपटांमुळे तो तेलुगू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार बनला.
आगामी चित्रपट
सध्या ज्युनिअर एनटीआर त्याच्या आगामी चित्रपटांमुळेही चर्चेत आहे. आता तो 'ड्रॅगन' चित्रपटाचे शूटिंग करत आहे. त्याचे दिग्दर्शन प्रशांत नील करत असून हा एक ॲक्शन-ड्रामा चित्रपट आहे, जो २५ जून, २०२६ रोजी रिलीज होऊ शकतो.