Jolly LLB 3 Trailer Pudhari
मनोरंजन

Jolly LLB 3 Trailer: यावेळी कोणत्या केसवर भिडणार दोन्ही जॉली? धमाकेदार ट्रेलर समोर ; या दिवशी होणार सिनेमा रिलीज

दोन्ही जॉली प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी आणण्यासाठी सज्ज आहेत

अमृता चौगुले

बहुप्रतीक्षित जॉली एलएलबी 3 सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अर्थात या ट्रेलरमध्ये दोन्ही जॉली प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी आणण्यासाठी सज्ज आहेत हे दिसून येत आहे. हा सिनेमा 19 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. (Latest Entertainment News)

काय आहे ट्रेलरमध्ये?

ट्रेलरची सुरुवात होते एका वारसाने मिळालेल्या जमिनीच्या मोनोलॉगने. अनेक शेतकरी त्यांची जमीन वाचवण्यासाठी अक्षय कडे केस घेऊन येतात. पण आता या चित्रात एंट्री झाली आहे. अर्शद वारसीची. शेतकऱ्यांची जमीन, खेताननावाच्या व्यक्तीचे प्रस्थ आणि दोन्ही जॉलीमध्ये रंगणारा कोर्टरुम ड्रामा याने हा ट्रेलर सजला आहे.

आता हे दोन्ही जॉली न्याय मिळवण्यासाठी एकमेकांसोबत लढणार की एकमेकांविरोधात उभे राहणार हे लवकरच समजेल.

हा तिसरा सिनेमा

जॉली एलएलबी हा या सिरिजमधील तिसरा सिनेमा आहे. या सिनेमाच्या पहिल्या पार्टमध्ये अर्शद वारसी मुख्य भूमिकेत होता. त्याच्यासोबत सौरभ शुक्ला आणि बोमन इराणी यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा सिनेमा 2013 मध्ये रिलीज झाला होता. 2017 मध्ये आलेल्या दुसऱ्या भागात अक्षय कुमार, हुमा कुरेशी आणि अनू कपूर यांच्या मुख्य भूमिका होत्या. यात जॉलीच्या भूमिकेत अर्शद ऐवजी अक्षय दिसला होता. आता आठ वर्षांनंतर या सिनेमाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

कोण कोण दिसणार तिसऱ्या भागात?

तिसऱ्या भागात पहिल्या भागातील दोन्ही जॉलींची जुगलबंदी दिसते आहे. या भागात अक्षय कुमार, अर्शद वारसी, गजराज राव, सौरभ शुकला, सीमा विश्वास, अमृता राव, हुमा कुरेशी हे कलाकार दिसत आहेत.

काय होते पहिल्या भागाचे कथानक

वास्तविक जीवनातील घटनेवर जॉली एल एल बी हा सिनेमा आधारलेला होता. यात उद्योगपती संजीव नंदा यांच्यावर बीएमडब्ल्यूने सहा जणांना चिरडल्याचा आरोप होता. या सिनेमातून पहिल्यांदा कायदेशीर व्यवस्थेतील लूपहोल्स समोर आणून ते व्यंगात्मक पद्धतीने मांडले होते.

तर दूसरा सिनेमा खोट्या चकमकीतून एका निष्पाप माणसांचा जीव घेतला जातो. त्याला न्याय मिळवून देण्याच्या संपूर्ण प्रक्रियेवर हा सिनेमा भाष्य करतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT