मॉडेलिंगमध्ये यशस्वी करियर केल्यानंतर जॉन अब्राहमने सिनेमाकडे मोर्चा वळवला. महेश भटच्या जिस्म या सिनेमातून त्याने बॉलीवुडमध्ये पदार्पण केले. 2003 मध्ये जिस्म रिलीज झाली होती. त्या सिनेमाने रिलीज होताच मोठी खळबळ उडवली होती. यातील बोल्ड सीन तसेच जॉनच्या फिजिकची बरीच चर्चा होती. (Latest Entertainment News)
याबाबतच्या काही आठवणी जॉन अब्राहमने नुकत्याच शेयर केल्या आहेत. आपल्या मुलाखतीमध्ये तो म्हणतो, ‘तो सिनेमाच अशा प्रकारचा होता. त्यामुळे त्यावेळी या सिनेमाची जी गरज होती मी पूर्ण केली. असा कंटेंट पाहणारा ही एक वर्ग आहे. त्याला याचे कौतुक आहे. त्यामुळे मला असे काम करताना काही वाटत नाही.’
पण या सिनेमानंतरच्या आपल्या भूमिका निवडीबाबत बोलताना तो म्हणाला, ‘ या सगळ्यात कलाकार म्हणून मला के हवे आहे हे पाहणे ही तितकेच महत्वाचे होते. त्यामुळे मी या सिनेमानंतर मी काबूल एक्सप्रेस, न्यूयॉर्क, मद्रास कॅफे आणि द डिप्लोमॅट अशा प्रकारचे सिनेमे निवडले.
जिस्ममुळे बनलेल्या प्रतिमेपासून बाहेर पडणे अवघड झाले होते. पण केवळ मुलाखतीमध्ये सांगून सांगून आपली प्रतिमा बदलता येणार नाही. त्यासाठी कामच करावे लागेल. काम हीच ओळख आहे. जेव्हा लोक तुमच्याशी बोलतात, ते कशा पद्धतीने बोलतात यावरून समजते त्यांच्या मनात तुमची इमेज काय आहे.’
अभिनेता म्हणून जिस्ममधून डेब्यू केलेल्या जॉनने 2012 मध्ये विकी डोनर या सिनेमातून निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला. या सिनेमातून यामी गौतम आणि आयुष्मान खुराना यांनीही सिनेसृष्टीत डेब्यू केला होता.
जॉन आता तेहरान या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोलिटिकल अॅक्शन प्रकारातील या सिनेमा खऱ्या घटनेवर बेतलेली काल्पनिक गोष्ट आहे.