सुजैन खान आणि जायद खानची आई जरीन खान यांची प्रार्थना सभा मुंबईतील एका हॉलमध्ये झाली. यावेळी अनेक सेलिब्रिटी श्रद्धांजली देण्यास उपस्थित होते. प्रार्थना सभेत अभिनेते जितेंद्र यांचे अचानक तोल गेला आणि ते जमिनीवर पडले.
Actor Jeetendra Falls Down
मुंबई - मुंबईत अभिनेत्री आणि सुजैन खानची आई झरीन खान यांच्या निधनानंतर त्यांच्या प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते जितेंद्रही सहभागी झाले होते. मात्र या दरम्यान एक अनपेक्षित प्रसंग घडला. प्रार्थना सभेतून बाहेर पडताना जितेंद्र यांचा तोल गेला आणि ते जमिनीवर पडले.
घटनेदरम्यान जितेंद्र यांच्यासोबत त्यांच्या सहाय्यक कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी त्वरित त्यांना आधार देत उभं केलं आणि काही क्षणातच त्यांना स्थिर केलं. सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झालेली नाही, मात्र काही क्षणांसाठी सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं.
जितेंद्र यांचे वय सध्या ८३ वर्षे आहे. इतक्या वयात ते अजूनही विविध कार्यक्रमांना उपस्थित राहतात, यामुळे त्यांच्या फिटनेसबद्दल चाहत्यांमध्ये कौतुक असतं.
video- varindertchawla insta वरून साभार
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिसतं की, जरीन खान यांच्या प्रार्थना सभेत जाताना अभिनेते जितेंद्र यांचा तोल अचानक जातो आणि ते जमिनीवर पडतात. पण सिक्युरिटी गार्डने दक्षता बाळगत पटकन त्यांची मदत केली आणि त्यांना पुन्हा उभे केले. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
जितेंद्र यांना कुठलीही दुखापत नाही
अभिनेते जितेंद्र यांचे फॅन्स हे वृत्त ऐकून चिंतेत पडले. पण, त्यांना कुठलीही दुखापत झाली नसून फॅन्सचा जीव भांड्यात पडलाय. प्रार्थना सभेतून परतताना जितेंद्र यांनी हसत पापराझींची भेट घेतली.