ब्लॅक मॅजिक आणि त्यामागचा थरार आता ओटीटीवर अनुभवता येणार आहे. 2025 मध्ये लक्षवेधी चित्रपट म्हणून जारणने चांगली कमाई केली होती. अमृता सुभाष आणि अनीता दाते या दोघींची जबरदस्त केमिस्ट्री या चित्रपटात दिसली होती. (Entertainment News Update)
पण ज्यांना हा सिनेमा थिएटरवर पाहायची संधी मिळाली नव्हती त्या प्रेक्षकांना आता हा सिनेमा घरबसल्या पाहता येणार आहे. जारण आता ओटीटी वर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. जारण आता झी 5 वर दिसणार आहे. 8 ऑगस्टला हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. ए अँड एन सिनेमा एलएलपी आणि ए 3 इव्हेंट्स अँड मीडिया सर्व्हिसेस प्रॉडक्शनच्या सहकार्याने अनीस बझ्मी यांनी हा चित्रपट सादर केला आहे. थ्रिलर जॉनरचा हा सिनेमा ओटीटीप्रेमींसाठी एक पर्वणी आहे. अनिता दाते, किशोर कदम, अवनी जोशी, राजन भिसे, सीमा देशमुख हे कलाकार या सिनेमात आहेत. जारण 6 जूनला हा सिनेमा थिएटरवर रिलीज झाला होता.
उत्तम पटकथा, साजेसे बॅकग्राऊंड म्युझिक आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे हा सिनेमा रिलीजनंतर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केले आहे.