Janhvi Kapoor Bheegi Saree Song Instagram
मनोरंजन

Janhvi Kapoor Bheegi Saree Song | 'भीगी साडी' पाहून आठवेल 'टीप-टीप बरसा पानी', जान्हवी-सिद्धार्थचे रोमँटिक गाणे

Janhvi Kapoor Bheegi Saree Song | 'भीगी साडी' पाहून आठवेल 'टीप-टीप बरसा पानी', जान्हवी-सिद्धार्थचे रोमँटिक गाणे

स्वालिया न. शिकलगार

Janhvi Kapoor Bheegi Saree Song out

मुंबई - अभिनेत्री जान्हवी कपूर-सिद्धार्थ मल्होत्राचा आगामी चित्रपट 'परम सुंदरी'मधील रोमँटिक गाणे रिलीज झाले आहे. 'भीगी साडी' असे रोमँटिक ट्रॅक असून हे मान्सून गाणे व्हायरल होत आहे. दोघांची केमिस्ट्री फॅन्सना खूप पसंतीस पडत आहे. 'भीगी साडी'तून अदनान सामीच्या बॉलीवूड संगीतमध्ये वापसी करत आहे. तर श्रेया घोषालनेही सुंदर आवाज दिला आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा-जान्हवी कपूर 'परम सुंदरी'चं 'भीगी साडी' हे गाणे पाहिल्यानंतर तुम्हाला टीप टीप बरसा पानी या गाण्याची आठवण येईल. सचिन-जिगरने संगीत दिलं आहे. अमिताभ भट्टाचार्य यांचे बोल आहेत. गाण्यात जान्हवी पांढऱ्या रंगाच्या साडीत दिसतेय तर सिद्धार्थ कॉटन शर्टमध्ये दिसतो.

निर्मात्यांनी पोस्टमध्ये काय लिहिलं?

आज निर्मात्यांनी इन्स्टाग्राम हँडलवर चित्रपटाचे गाणे 'भीगी साडी' शेअर केली आणि कॅप्शनमध्ये लिहिली, 'अदनान सामी सोबत जुनी आठवणी ताज्या झाल्या. प्रेम आणि उत्साहाने भरपूर, अदनान सामीच्या आवाजात सादर आहे #BheegiSaree। भीगी साडी गाणे आता रिलीज झाले आहे. वर्षाची सर्वात मोठी कहाणी - #परमसुंदरी २९ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात रिलीज होत आहे.

कॉमेंट्सचा पाऊस

हे गाणे पाहून एका फॅनने लिहिलं, 'खूप सुंदर आणि अद्भुत गीत.' आणखी एकाने लिहिले, 'खूप हॉट'. दुसऱ्या फॅनने लिहिले, 'OMG', तिसऱ्या फॅनने लिहिले, 'काय गाणे आहे'. तर अन्य काही नेटकऱ्यांनी रेड हार्ट इमोजी आणि फायर इमोजी शेअर केले आहेत.

SCROLL FOR NEXT