बॉलिवूड पाठोपाठ दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपले पाय रोवणारी अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी 'पेड्डी' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. एका प्रमोशनल इव्हेंटदरम्यान जान्हवीला पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी झाली होती. या गर्दीत एका चाहत्याने सुरक्षेची फळी ओलांडून जान्हवीच्या अत्यंत जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या सुपरस्टार राम चरणच्या एका खास आणि विश्वासू बॉडीगार्डने वेळीच तत्परता दाखवली आणि त्या चाहत्याला बाजूला सारून जान्हवीला सुरक्षित स्थळी पोहोचवले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Janhvi Kapoor horrible moment at peddi movie pramotion
दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या त्यांच्या आगामी 'पेड्डी' (Peddi) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूप बिझी आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला, ज्यामुळे जान्हवी कपूर प्रचंड घाबरली.
उपस्थितांमधील एक जण सुरक्षा रक्षकांना ओलांडून थेट मंचावर पोहोचला. त्यावेळी कार्यक्रमात एकच खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल आहे. तो व्यक्ती राम चरणचा चाहता असल्याचे म्हटल जाते.
नेमकं काय घडले?
'पेड्डी' चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमात राम चरण आणि जान्हवी कपूर उपस्थित होते. यावेळी राम चरणचा एक चाहता, ज्याने हुबेहूब राम चरणसारखीच वेशभूषा केली होती. तो अचानक वेगाने दोघांच्या दिशेने धावत आला. त्या चाहत्याचा वेग इतका होता की कोणालाही काही समजण्याच्या आत तो जान्हवीच्या अगदी जवळ पोहोचला. सुदैवाने, राम चरणचा वैयक्तिक बॉडीगार्ड आणि आंतरराष्ट्रीय एमएमए (MMA) फायटर केविन कुंटा याने प्रसंगावधान राखले. त्याने त्या चाहत्याला जान्हवीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच हवेत रोखले आणि त्याला बाजूला ढकलले. मात्र, या झटापटीत तो चाहता जान्हवीवर जाऊन पडल्याचे व्हिडिओत दिसते. ज्यामुळे जान्हवी पूर्णपणे गोंधळून गेली.
(video -Vinnu_Tweettz x account वरून साभार)
बॉडीगार्डचे सर्वत्र कौतुक
या घटनेनंतरचा एक दुसरा व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये परिस्थिती शांत झाल्यावर त्या चाहत्याला राम चरणला भेटण्याची परवानगी देण्यात आली. तो चाहता खूपच भावूक झाला होता आणि त्याने राम चरणचे आभार मानत त्याच्या पायाला स्पर्श केला. मात्र, ज्या पद्धतीने बॉडीगार्ड केविन कुंटाने ही परिस्थिती हाताळली, त्याचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
कोण आहे रामचरणचा बॉडगार्ड?
केविन हा मूळचा गांबियाचा असून तो इटलीमध्ये राहतो, त्याचे स्वतःचेही आता सोशल मीडियावर मोठे फॅन फॉलोइंग तयार झाले आहे. तो आंतरराष्ट्रीय व्यावसायिक MMA फायटर आहे.
रामचरण म्हणतो-
राम चरण आपल्या बॉडीगार्डबद्दल सांगितले होते. तो म्हणतो- माझ्या बॉडीगार्डचे नाव केविन आहे. मी त्याला केवळ पेड्डीसाठी हायर केलेले नाही किंवा माझ्या सुरक्षेसाठी नाही. तर तो माझ्या मुले, पत्नी, परिवाराची सुरक्षा करतो. तो मागील ४ वर्षांपासून माझ्यासोबत आहे.
'पेड्डी' चित्रपटाबद्दल...
'पेड्डी' हा तेलुगू स्पोर्ट्स ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. १९८० च्या दशकातील आंध्र प्रदेशावर आधारित या चित्रपटात क्रिकेट आणि पारंपरिक कुस्ती यांची सांगड घालून ही कथा दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन बुची बाबू सना यांनी केले असून, ए.आर. रहमान यांचे संगीत आहे. चित्रपटात राम चरण आणि जान्हवीसोबत शिव राजकुमार, जगपती बाबू, दिव्येंदू यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ४ जून २०२६ रोजी भेटीला येणार आहे.