Janhvi Kapoor role in Peddi  Instagram
मनोरंजन

Janhvi Kapoor in Peddi |केवळ ग्लॅमरपुरतीच भूमिका? ‘पेड्डी’मधील जान्हवी कपूरच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; प्रेक्षकांचा संताप

Janhvi Kapoor in Peddi | ‘पेड्डी’मधील जान्हवी कपूरच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; प्रेक्षकांचा संताप सोशल मीडियावर व्यक्त

स्वालिया न. शिकलगार

राम चरण अभिनीत ‘पेड्डी’ चित्रपटातील जान्हवी कपूरच्या भूमिकेबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. चित्रपटातील पोस्टर आणि प्रमोशनल सामग्री पाहिल्यानंतर काही प्रेक्षकांनी तिचे पात्र कथानकात प्रभावी नसून केवळ आकर्षक उपस्थितीपुरते मर्यादित असल्याची टीका केली आहे. महिला पात्रांना योग्य वाव मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करत अनेकांनी निर्मात्यांना प्रश्न विचारले आहेत. मात्र चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अंतिम निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे मत काही चाहत्यांनी व्यक्त केले आहे.

३५० कोटी रुपयांच्या बजेट असलेल्या पेड्डी या चित्रपटावर आता टीका होतेय. नेटकऱ्यांनी जान्हवीच्या पात्राचे 'वस्तूकरण' (objectification) झाल्याचे म्हटले आहे. पेड्डी या चित्रपटात रामचरण आणि जान्हवी कपूर यांची मुख्य भूमिका आहे. पण जान्हवीला ज्या प्रकारे सादर करण्यात आले आहे, त्यामुळे संवाद आणि दृश्यांच्या सादरीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

राम चरण आणि जान्हवी कपूरचा 'पेड्डी' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. चित्रपट प्रदर्शित होताच नवा वाद निर्माण झाला असून तिच्या भूमिकेवरून ही टीका होत आहे. कथा किंवा दिग्दर्शनावर ही टीका नाहीये तर जान्हवीच्या अत्यंत कमकुवत दृश्यावरील ही टीका आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेला कोणतेही महत्व अथवा अर्थ नाहीये. केवळ ग्लॅमरस दाखवण्यासाठी पडद्यावर सादर करण्यात आल्याचे प्रेक्षक म्हणत आहेत.

चित्रपटात जान्हवीच्या पात्राला कोणताही उद्देश नसल्याने, अभिनेता आणि दिग्दर्शक बुची बाबू सना या दोघांवरही टीका केली जात आहे. 'पेड्डी' चित्रपटात जान्हवी कपूरला ज्या प्रकारे दाखवण्यात आले आहे, त्याबद्दल चाहते नाराज आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, सेन्सॉर बोर्ड हिंसाचाराच्या दृश्यांवर लगेच कारवाई करते, पण महिलांच्या शोषणाकडे दुर्लक्ष का करते? त्यांनी महिलांच्या सन्मानासाठीही तितक्याच वेगाने काम करायला हवे.

'पेड्डी'मध्ये जान्हवी कपूरचे चित्रण केवळ ..सोशल मीडियावर संताप

चाहत्यांनी सोशल मीडियावर उघडपणे आपला संताप व्यक्त केला आहे. जान्हवीच्या चित्रपटातील भूमिकेवर तीव्र टीका केली आहे. एकाने लिहिले, "निवडणूक प्रचारादरम्यान, एक गुंड सर्वांसमोर जान्हवीचा अपमान करतो. दिब्येंदू जणू काही मजा घेत असल्यासारखा हसतो. राम चरणला त्याला गावचा हिरो म्हटले जाते....अत्यंत सुमार चित्रण."

आणखी एकाने लिहिले, "'पेड्डी'मधील एका दृश्यात, राम चरण जान्हवी कपूरची प्रशंसा करतो. तो तिच्या डोळ्यांबद्दल, ओठांबद्दल बोलतो, पण दृश्ये वेगळीकडेच वळतात. माझा एडिटरला प्रश्न आहे, तुम्ही खरंच इतके मूर्ख आहात का की तुम्हाला डोळे काय असतात आणि ओठ काय असतात हे कळत नाही?"

एक जण म्हणाला, "नायिकेला एक भूमिका मिळायला हवी होती. त्याऐवजी, तिला अश्लील, अपमानजनक आणि ढोंगी दृश्ये देण्यात आली... हे निव्वळ निकृष्ट आणि लज्जास्पद लेखन आहे... प्रेक्षकांमधील प्रत्येक स्त्रीसाठी हे पूर्णपणे लाजिरवाणे आहे."

दुसरीकडे, एका नेटकऱ्याने म्हटलंय-एका आघाडीच्या अभिनेत्रीचा Peddi या चित्रपटात झालेला अपमान हा "आजवरचा सर्वात महागडा अपमान" आहे. त्याच्या या इन्स्टाग्राम पोस्टला जान्हवी कपूरने 'लाईक' केल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे पुन्हा नवीन चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT