Dada Satram Rohra passed away
चित्रपट निर्माते दादा सतराम रोहरा यांचे निधन  Instagram
मनोरंजन

Dada Satram Rohra Dies : 'जय संतोषी मां' चित्रपटाचे निर्माते दादा सतराम रोहरा काळाच्या पडद्याआड

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : १९७५ मध्ये रिलीज झालेला चित्रपट 'जय संतोषी मां'चे निर्माते दादा सतराम रोहरा यांचे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. सिंधी समुदायात दादा सतराम रोहरा यांचे मोठे नाव होते.

जय संतोषी मां हा सुपरहिट आणि रेकॉर्डब्रेक चित्रपट होता. रेडियो सिंधीने इन्स्टाग्रामवर सतराम रोहरा यांच्या निधनाची माहिती दिली. दादा सतराम रोहरा एक गायक देखील होते. त्यांनी अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली. यामध्ये 'जय संतोषी मां' शिवाय 'हाल ता भाजी हालूं' यासारखे चित्रपट आहेत.

'जय संतोषी मां'ची रेकॉर्डब्रेक कमाई

'जय संतोषी मां' १९७५ ची सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड या चित्रपटाने तोडले होते. रिपोर्ट्सनुसार, 'जय संतोषी मां'चे बजेट केवळ ५ लाख रुपये होता. पण त्यावेळी तब्बल ५ कोटींची कमाई झाली होती.

दादा सतराम रोहरा यांनी दादा राम पंजवानी, भगवंती नवानी, कमला केसवानी आणि अन्य प्रसिद्ध गायकांसोबत गाणी गायली आहेत.

दादा सतराम रोहरा यांच्याविषयी

१६ जून, १९३९ रोजी सिंधी परिवारात जन्मलेले दादा सतराम रोहराने १९६६ मध्ये चित्रपट 'शेरा डाकू'च्या माध्यमातून प्रोडक्शनच्या दुनियेत पाऊल ठेवले होते. त्यांनी 'रॉकी मेरा नाम', 'घर की लाज', 'नवाब साहिब', 'जय काली' चित्रपटांची निर्मिती केली. या चित्रपटामध्ये अभिनेत्री अनीता गुहा मां संतोषी यांच्या भूमिकेत होत्या.

SCROLL FOR NEXT