ईडीने जॅकलिनला आज सकाळी ११ वाजता चौकशीसाठी बोलावले आहे  Jacqueliene Fernandez Instagram
मनोरंजन

Money Laundering Case : जॅकलीन फर्नांडिसला ईडीचे समन्स; आज चौकशी

मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून चौकशी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिला तथाकथित महाठग सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे. आज ईडी मुख्यालयात चौकशीसाठी तिला बोलावण्यात आले आहे.

जॅकलीनला आज ११ वाजता ईडीच्या मुख्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. ईडी अधिकारी तिची चौकशी करू शकतात. काल मंगळवारी सुकेशने जॅकलीनला पत्र लिहिले होते.

ईडी चार्जशीट फाईल

ईडीकडून याआधी अनेकदा जॅकलीनला चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. महाठग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीने सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलीन फर्नांडिस विरोधात चार्जशीट फाईल केली आहे. जॅकलीनला या प्रकरणात जामीन मिळाला आहे.

चार्जशीटमध्ये काय समोर आलं?

चार्जशीटनुसार, सुकेश चंद्रशेखरने खुलासा केला की, त्याची मैत्री जॅकलीन फर्नांडिस सोबत झाल्यानंतर त्याने जॅकलीनला कोटी रुपयांचे महागड्या भेटवस्तू दिल्या. यामध्ये बॅग, दागिने, महागडे कपडे, १५ जोडी ईअरिंग्ज, ५ बिरकीन बँग, चॅनल आणि YSL चे बॅग, महागडे चपला, सुपर लक्झरी ब्रँडचे ब्रेसलेट, बांगड्या, रोलेक्स सारखे महाग घड्याळ समाविष्ट आहेत.

काल सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला पाठवलं होतं पत्र

मंगळवार, ९ रोजी जॅकलिनला सुकेश चंद्रशेखरने तुरुंगातून जॅकलीनच्या नावाने पत्र देखील लिहिलं होतं. सुकेशने जॅकलीनला ३ पानी पत्र लिहिलं होतं. तिच्या वाढदिवसासाठी ३० दिवसांच्या काऊंटडाऊनची घोषणा केली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT