मनोरंजन

kbc 13 : शोलेच्या तीन मिनिटांच्या सीनसाठी लागले तब्बल ३ वर्ष

अनुराधा कोरवी

मुंबई; पुढारी ऑनलाईन : छोट्या पडद्यावरील 'कौन बनेगा करोडपती १३' (kbc 13 ) शो चाहत्यांच्या घराघरात पोहोचला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमिताभ बच्चन करत आहेत. या शोमध्ये दर शुक्रवारच्या विशेष भागात कलाकांराची एन्ट्री होते. या विशेष भागात सध्या गाजलेल्या 'शोले' या चित्रपटातील बॉलिवूडची ड्रिम गर्ल हेमा मालिनी आणि दिग्दर्शक रमेश सिप्पी हे शोच्या हॉट सीटवर दिसले. कौन बनेगा करोडपती १३ शोचा प्रोमो युटयूब चॅनलवर रिलीज होत आहे. यात शोले चित्रपटातील वेगवेगळे खुलासे करण्यात येत आहेत.

नुकतेच 'शोले' चित्रपटाने ४६ वर्षांचा टप्पा पार केला आहे. याच निमिताने 'कौन बनेगा करोडपती १३'  (kbc 13 ) शोमध्ये बीग बींनी ड्रिम गर्ल हेमा मालिनी आणि दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना पाचारण केलं आहे. यावेळी 'शोले' चित्रपटादरम्यान घडलेल्या घटनेचे खुलासे समोर आले आहेत. अभिनेते धर्मेंद्रही व्हिडिओ कॉलद्वारे या शोमध्ये सहभागी झाले होते.

या प्रोमोमध्ये हेमा मालिनीने शोले चित्रपटातील काही सीन करून आपल्या आवाजाच्या शैलीत म्हटले आहेत. याच दरम्यान शोले चित्रपटाच्या ३ मिनिटांच्या सीन शूट करण्यासाठी तब्बल ३ वर्षे लागले असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. हा सीन म्हणजे, अमिताभ बच्चन घराच्या पायऱ्यांवर माऊथ आर्गन वाजवत असतात आणि यावेळी जया बच्चन दुसऱ्या घराच्या माळ्यावरील व्हरांड्यात उभी राहून दिवे मालवताना दिसत आहे. या सीन दरम्यान घराच्या पाठीमागे सूर्य मावळताना दिसतो. हा फरफेक्ट सीन घेण्यासाठी दिग्दर्शकाला तब्बल साडेतीन वर्षाची वाट पाहावी लागली होती.

याशिवाय या चित्रपटात काम करताना २८ किलोमीटर पायी चालत जावे लागल्याचा देखील खुलासा केला आहे. याचदरम्यान बिेग बींनी हेमा यांना बहुतांश महिला घरातून बाहेर पडताना एखादी छोटीशी पर्स घेवून बाहेर पडतात त्यात नेमके काय असते? असा प्रश्न विचारतात. यांचे उत्तर देताना हेमा म्हणाल्या की, महिलांच्या पर्समध्ये मेकअपचे साहित्य आणि थोडेसे पैसे असतात.

यानंतर अमिताभ पुन्हा महिली मेकअप करून घराबाहेर पडतात तर हे मेकअपचे साहित्य कशासाठी असते. या प्रश्नाचे उत्तर देताच सर्वजण हसतात. जसा वेळ जाईल तसा मेकअप कमी होत जातो त्‍यामुळे हे साहित्‍य ठेवावे लागते, असे हेमा मालिनी यांनी सांगितले. याशिवाय बिग बींनी आपली मुलगी देखील शाेले चित्रपटात सहभागी झाल्‍याचा खुलासा केला आहे. हा चित्रपटातील जया बच्चनचा सीन सुरू होता तेव्हा त्या प्रेंग्नट होत्या. यामुळे ते शोले चित्रपटावेळी अप्रत्यक्षरित्या सहभागी असल्याचे म्हटले आहे.

शोच्या प्रोमोमध्ये रमेश सिप्पी यांनी अमिताभ यांना चित्रपटात कसे कास्ट केले? याविषयी सांगितले की, 'आनंद' आणि 'बॉम्बे टू गोवा' या चित्रपटातील अमिताभ यांची भूमिका पाहिली. यानंतर त्यांना वाटले की, ते कोणतीही भूमिका उत्तमप्रकारे करू शकतात. यानंतर अमिताभ यांना कास्ट करण्‍यात आले.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT