Isha Malviya leave Laughter Chefs show
"लाफ्टर शेफ्स ३"मधील स्पर्धकच नाही तर प्रत्येक भाग, प्रत्येक क्षण आनंदाने भरलेला आहे. आता आगामी भागाची एक झलक रिलीज करण्यात आली आहे. प्रोमोमध्ये निया शर्मा सनी लिओनीसोबत दिसू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, ईशा मालवीय शो सोडत असल्याची माहिती समोर आली आहे.
लाफ्टर शेफ्स ३ मध्ये मजेशीर डायलॉग्जनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. निया शर्मा आणि सनी लिओनी सध्या आगामी भागात दिसणार आहेत. आता प्रेक्षक त्याच्या रिलीजची प्रतीक्षा वाट पाहत आहेत. शोमधील आणखी एक सुंदर सेलिब्रिटी ईशा मालवीय ही शो सोडण्याच्या वृत्तामुळे चर्चेत आहे. पण, याबाबत तिने अद्याप कुठलीही घोषणा केलेली नाही. तिने तिच्या इन्स्टाग्राम चॅनेलद्वारे हे वृतेत शेअर केले.
ईशा मालवीयने एक व्हॉइस नोट शेअर केली असून त्यामध्ये महटलंय की, कोणालाही बदलण्यात आले नाही, परंतु तिच्याकडे अन्य प्रोजक्ट आहेत. म्हणून ती लाफ्टर शेफ्समध्ये काम करू शकत नाही. तिने आगामी प्रोजेक्टबद्दल सांगितले की, ती इंडस्ट्रीमधील तिच्या पुढच्या मोठ्या प्रोजेक्टसाठी काम करत आहे. काही फॅन्स ईशाच्या पुढील प्रोजेक्टबद्दल आनंदी होते, तर काही फॅन्स तिच्या शो सोडण्याच्या शक्यतेमुळे दुःखी होते.
ईशा मालवीय 'लाफ्टर शेफ्स ३' सोडण्याबद्दल म्हणाली, 'मित्रांनो, लाफ्टर शेफ्सबद्दलच्या बातम्यांबद्दल जास्त काळजी करू नका. कोणीही बदललेले नाही. ही माझी वैयक्तिक अडचण आहे कारण माझ्या तारखा आगामी लाफ्टर शेफ्सच्या शूटिंग शेड्यूलशी जुळत नाहीत. माझे काही इतर प्रोजेक्ट आहेत, म्हणून मी ते सोडू शकत नाही. तो दुसरा प्रोजेक्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण तो इंडस्ट्रीमध्ये माझे पहिले मोठे पाऊल असू शकते. मी सर्वांना विनंती करते की, माझ्या कामात मला साथ द्यावी.'
निया शर्मा आणि सनी लिओनी पोहोचले शोमध्ये
'स्प्लिट्सव्हिला एक्स६' मधून मन जिंकणारी निया शर्मा शोमध्ये प्रवेश करणार आहे. ती लाफ्टर शेफ्स ३ च्या एका खास एपिसोडमध्ये सनी लिओनीसोबत परतणार आहे. किचनवर आधारित शोचा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. प्रोमोची सुरुवात निया, सनी लिओनी आणि करण कुंद्राच्या शोमध्ये एन्ट्रीने होते.
निया शर्माचे ते खास व्हिडिओ व्हायरल
निया आपली ओळख इंग्लिशमध्ये करून देते. निया म्हणते की, ती स्प्लिट्सविला X6 ची खूप अवखळ मुलगी आहे. अली मजेत तिला म्हणतो की, तू हिंदीमध्ये बोल. तेव्हा कृष्णा म्हणतो, 'आता मी तुम्हाला नटखट मुलीशी भेटवतो.' त्यानंतर तो सीजन १ मधून नियाचे मजेशीर व्हिडिओ दाखवतो. ज्यामध्ये ती जमिनीवर बसून आरडाओरडा करते.